डिकोल्ड टोटलसहीत 343 औषधांवर येणार बंदी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 01:43 PM2018-08-04T13:43:23+5:302018-08-04T13:43:34+5:30

सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.

health ministry likely to ban over 343 combo drugs | डिकोल्ड टोटलसहीत 343 औषधांवर येणार बंदी ?

डिकोल्ड टोटलसहीत 343 औषधांवर येणार बंदी ?

नवी दिल्ली - सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.  पेन किलर आणि फ्लू शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे असल्याचे  आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या औषधांवर बंदी घालण्यात यावी यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उप समितीने शिफारस केली होती. या शिफारसीनुसार औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, या औषधांवर बंदी घातली गेल्यास पिरामल, मॅक्लिऑड्स, सिप्ला आणि ल्युपिनसारख्या राष्ट्रीय कंपन्यांना फटका बसणार आहे. सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी कोल्ड टोटलसारखे कफ सिरप आणि पेन किलरवर बंदी येईल.
ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड (डीटीएबीने) दिलेल्या शिफारसींनुसार ज्या औषधांवर  बंदी घालण्यात येणार आहे, त्याची यादी तयार करण्यात आल्याचे समजते आहे. 343 औषधांचा  डीटीएबीने यादीत समावेश केल्याचे म्हटले जात आहे.  

Web Title: health ministry likely to ban over 343 combo drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.