haryana stepfather putting chilli 11 year old girls private part | क्रूरता ! आईसमोरच मुलीच्या गुप्तांगात मिरचीपूड टाकून मारहाण करायचा सावत्र बाप
क्रूरता ! आईसमोरच मुलीच्या गुप्तांगात मिरचीपूड टाकून मारहाण करायचा सावत्र बाप

नवी दिल्ली - बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एक सावत्र बाप 11 वर्षांच्या मुलीच्या गुप्तांगामध्ये मिरचीपूड टाकून तिला बेदम मारहाण करत असल्याचा धक्कादायक व तितकाच गंभीर प्रकार समोर आला आहे. मनाला हादरवणारी ही घटना हरियाणातील अंबाला जिल्ह्यात घडली आहे. गंभीर बाब म्हणजे, हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या आईच्या डोळ्यांदेखत घडत होता, मात्र तिनं कधीही आपल्या पोटच्या मुलीला या अमानुष अत्याचारातून वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.   शेजारी राहणा-यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर ही घटना उजेडात आली आहे. शेजा-यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीमुळे पीडित मुलीचे प्राण वाचू शकलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईवडिलांचा घटस्फोटासाठी कोर्टात खटला सुरू आहे. तीन वर्षांपासून ही महिला अंबालामधील हरि नगरातील आपल्या प्रियकरासोबत राहत आहे. या महिलेचा प्रियकर तिच्या मुलीला नेहमी अमानुष मारहाण करायचा. वेदनेनं पीडित मुलगी किंचाळायची, व्हिवळत होती. मात्र, आपल्याला मुलीला होणार त्रास पाहून या मातेच्या काळजात कधीही धस्स झाले आहे. तिच्या किंकाळ्या शेजा-यांच्या घरापर्यंत ऐकू यायच्या. पण या सर्वातून तिच्या आईनं तिला कधीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असे शेजा-यांनी सांगितले. अशाच पद्धतीनं एका संध्याकाळी मुलीला बेदम मारहाण होत असताना शेजा-यांनी चाइल्ड हेल्पलाईनला व पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं. पीडित मुलीच्या शरीरवर प्रचंड जखमा त्यांना यावेळी आढळून आल्या. एवढंच नाही तर तिचे केसही कापण्यात आले होते. 

पोलिसांनी पीडित मुलीची विचारपूस केली असता तिनं सांगितले की, तिचे सावत्र वडील गुप्तांगात मिरचीपूड टाकून तिला मारहाण करायचे. शिवाय, शाळेत पाठवणंदेखील बंद केले होते. दरम्यान, मुलीची आई व आरोपी पितानं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. घरातील पैसे चोरल्यामुळे आम्ही तिला ओरडलो होतो, यामुळे ती जोरजोरात ओरडू लागली, असे मुलीच्या आईनं पोलिसांना सांगितले. दरम्यान, पीडित मुलीची पोलिसांनी सुटका केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.  
 


Web Title: haryana stepfather putting chilli 11 year old girls private part
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.