लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का; 64 कोटींची संपत्ती होणार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 07:59 AM2019-05-30T07:59:20+5:302019-05-30T08:00:06+5:30

2005 मध्ये हरियाणाच्या तत्कालीन भूपेंद्र सिंह हुड्डा सरकारने कायदे धाब्यावर बसवून ही संपत्ती गांधी परिवाराच्या मालकीच्या एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला देण्यात आली होती.

Gandhi family gets one more shock; Rs 64 crores worth of property will be seized | लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का; 64 कोटींची संपत्ती होणार जप्त

लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का; 64 कोटींची संपत्ती होणार जप्त

Next

लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक झटका बसला आहे. ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी हरियाणाच्या पंचकुला येथील 64.93 कोटींची संपत्ती ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ईडीने नुकतेच रॉबर्ट वड्रा यांचा जामीन रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. 


2005 मध्ये हरियाणाच्या तत्कालीन भूपेंद्र सिंह हुड्डा सरकारने कायदे धाब्यावर बसवून ही संपत्ती गांधी परिवाराच्या मालकीच्या एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला देण्यात आली होती. ही संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ध न्यायिक प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. 
हे प्रकरण पंचकुलामध्ये एजेएलला हिंदी वृत्तपत्र नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनच्या प्रकाशनासाठी जमीन देण्याशी संबिधीत आहे. एजेएलवर कथितरित्या गांधी परिवार आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचे नियंत्रण असल्याचा आरोप होत आहे. 


एक डिसेंबर 2018 मध्ये पीएमएलएनुसार पंचकुलामध्ये सेक्टर 6 मध्ये सी-17 प्लॉटला जप्त करण्याचा आदेश देण्यात आला होता. आता  ही कारवाई करण्यास मनी लाँड्रिंग कायद्यानुसार मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी सीबीआयने हुडा आणि इतरांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे ईडीने कारवाई सुरु केली तरीही न्यायालयाच्या निर्णयानंतरच ही जमीन सरकारच्या ताब्यात देता येणार आहे. 

काय आहे प्रकरण 
1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री भजनलाल यांनी ही जमीन एजेएलला दिली होती. मात्र, 10 वर्षे काहीच बांधकाम झाले नसल्याने ती पुन्हा हरियाणा अर्बन डेवलपमेंट प्राधिकरणने मागे घेतली होती. 2005 मध्ये पुन्हा विरोध करूनही हुड्डा यांनी ही जमीन 1982 चीच किंमत लावत एजेएलला दिली होती. 64.93 कोटींची ही जमीन 59.39 लाख रुपयांना देण्यात आली होती. 

Web Title: Gandhi family gets one more shock; Rs 64 crores worth of property will be seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.