कालका-हावडा एक्स्प्रेसच्या डब्याला आग, पाच प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:31 AM2018-11-27T11:31:36+5:302018-11-27T11:45:43+5:30

कालका-हावडा एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे.  दिल्ली-अमृतसर रेल्वे मार्गावर मंगळवारी (27 नोव्हेंबर) पहाटेकुरुक्षेत्र येथील धीरपूर गावाजवळ ही घटना घडली.

five people injured in fire of kalka howrah express | कालका-हावडा एक्स्प्रेसच्या डब्याला आग, पाच प्रवासी जखमी

कालका-हावडा एक्स्प्रेसच्या डब्याला आग, पाच प्रवासी जखमी

Next
ठळक मुद्देकालका-हावडा एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे.दिल्ली-अमृतसर रेल्वे मार्गावर मंगळवारी पहाटे कुरुक्षेत्र येथील धीरपूर गावाजवळ ही घटना घडली. आगीत पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - कालका-हावडा एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे.  दिल्ली-अमृतसर रेल्वे मार्गावर मंगळवारी (27 नोव्हेंबर) पहाटे कुरुक्षेत्र येथील धीरपूर गावाजवळ ही घटना घडली. या आगीत पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कालका-हावडा एक्स्प्रेसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. कालका येथून दिल्लीकडे ही एक्स्प्रेस जात असताना ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, बचाव पथक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. 




 

Web Title: five people injured in fire of kalka howrah express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.