पाच जणांनी एका विवाहितेवर आळीपाळीनं केला सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावर टाकला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 02:43 PM2019-06-04T14:43:17+5:302019-06-04T14:43:25+5:30

राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यात कथित स्वरूपात एका महिलेवर 5 जणांनी आळीपाळीनं बलात्कार केला आहे.

five man sexually harassed 30 year old woman in rajasthan uploaded video on social media | पाच जणांनी एका विवाहितेवर आळीपाळीनं केला सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावर टाकला व्हिडीओ

पाच जणांनी एका विवाहितेवर आळीपाळीनं केला सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावर टाकला व्हिडीओ

Next

जयपूरः राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यात कथित स्वरूपात एका महिलेवर 5 जणांनी आळीपाळीनं बलात्कार केला आहे. या बलात्कारचा व्हिडीओ त्या नराधमांनी सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे. पोलिसांना या प्रकरणाचा पाचपैकी चार आरोपींना अटक केली आहे. रविवारी यासंदर्भात महिलेनं तक्रार दाखल केली होती. या पाच आरोपींनी 26 मे रोजी विवाहितेबरोबर दुष्कर्म केलं आहे. ती आपल्या मित्राबरोबर मंदिरात जात होती. त्याच दरम्यान महिलेला घेराव घालून त्या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला.

विशेष म्हणजे आरोपींनी या बलात्काराचा व्हिडीओ बनवला असून, तो सोशल मीडियावरही टाकला आहे. औद्योगिक क्षेत्राचे पोलीस ठाणेदार किशोर सिंह भाटी यांनी सांगितलं की, रविवारी पाच आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, मारहाण, छेडछाड आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारही आरोपी जितेंद्र भाट(20), गोविंद भाट(20), दिनेश भाट(24) आणि महेश भाट(22) यांना अटक करण्यात आली आहे. तर पाचवा आरोपी संजय भाट फरार आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पीडित महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं असून, महिलेचा पती मजूर आहे. 

Web Title: five man sexually harassed 30 year old woman in rajasthan uploaded video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.