राहुल गांधींसाठी तुम्हीच एक मुलगी शोधा, सोनिया गांधींनी यांच्यावर सोपवली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 04:12 PM2023-07-29T16:12:00+5:302023-07-29T16:18:17+5:30

Rahul Gandhi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा विवाह कधी होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमीच विचारला जातो. दरम्यान, आज हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Find a Bride for Rahul Gandhi, Sonia Gandhi entrusted the responsibility | राहुल गांधींसाठी तुम्हीच एक मुलगी शोधा, सोनिया गांधींनी यांच्यावर सोपवली जबाबदारी

राहुल गांधींसाठी तुम्हीच एक मुलगी शोधा, सोनिया गांधींनी यांच्यावर सोपवली जबाबदारी

googlenewsNext

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा विवाह कधी होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमीच विचारला जातो. दरम्यान, आज हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं झालं असं की, हरियाणामधील काही महिला शेतकरी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी आज दिल्लीत आल्या होत्या. तेव्हा राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय निघाला. त्यावेळी भेटीसाठी आलेल्या महिला शेतकऱ्यांनी आता राहुल गांधींचं लग्न करून टाका, असा सल्ला सोनिया गांधी यांना दिला. त्यावर आता राहुलसाठी तुम्हीच  मुलगी शोधा, असं सांगितलं. 

राहुल गांधी यांनी हरियाणामधील दौऱ्यावेळी तेथील महिलांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार या महिला शेतकऱ्यांना आज दिल्लीत बोलावण्यात आले होते. तिथे या महिला शेतकऱ्यांनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींचीही भेट घेतली. १० जनपथ येथे झालेल्या या भेटीवेळी एका महिलेने आता राहुल गांधींचं लग्न करून टाका असे सोनिया गांधी यांना सांगितले. त्यावर उत्तर देताना सोनिया गांधी यांनी आता त्याच्यासाठी तुम्हीच एखादी मुलगी शोधा, असे त्या महिलेला सांगितले. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, असं होईल…’

यावेळी प्रियंका गांधींनी महिलांना सांगितले की, लहानपणी राहुल खूप मस्तीखोर होते. मात्र त्यांना जास्त ओरडा ऐकावा लागत असे. ८ जुलै रोजी राहुल गांधी हे हरयाणातील सोनीपत येथील मदीना गावात अचानक थांबले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक लोकांची आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

राहुल गांधी यांनी तिथे भात लावणी केली होती. तसेच ट्रॅक्टर चालवला होता. शेतकरी महिलांनी आणलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला होता. त्यावेळी आम्ही दिल्लीच्या एवढ्या जवळ राहत असूनही दिल्ली पाहिली नाही, असे या महिला शेतकऱ्यांनी सांगितले होते. त्यावेळी मी तुम्हाला दिल्ली पाहण्यासाठी बोलावेन, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं.

Web Title: Find a Bride for Rahul Gandhi, Sonia Gandhi entrusted the responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.