पेट्रोलची दैनिक 'दरकपात' सुरूच, महागाईने त्रस्त नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 10:09 AM2018-11-23T10:09:43+5:302018-11-23T10:20:23+5:30

जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ कमकुवत होण्याची भीती आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय

Due to the 'petrol prices', petrol and diesel prices have come down | पेट्रोलची दैनिक 'दरकपात' सुरूच, महागाईने त्रस्त नागरिकांना दिलासा

पेट्रोलची दैनिक 'दरकपात' सुरूच, महागाईने त्रस्त नागरिकांना दिलासा

Next

नवी दिल्ली - देशात आजही पेट्रोल आणि डिझेलची दरकपात सुरूच आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने भारतात प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आजही देशातील महत्त्वाच्या शहारांमध्ये 40 ते 45 पैशांनी पेट्रोल व डिझेलची दरकपात झाली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ कमकुवत होण्याची भीती आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घटत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळाला असून,  रुपयाचे मूल्यही हळुहळू सावरत आहे.  त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये  मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेली पेट्रोलची दरकपात आजही कायम आहे. त्यानुसार, दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 75.57 रुपये असून मुंबईत हेच पेट्रोल 81.10 रुपये आहे. तर कोलकातमध्ये 77.53 आणि चेन्नईत 78.46 रुपये प्रती लिटर असा दर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमती 86 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे भारतात पेट्रोलच्या किमती लवकरच शंभरी गाठणार अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आंतराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती अचानक कोसळल्याने भारतातही पेट्रोल, डिझेलचे भाव घटले आहेत. भारत, चीन, दक्षिण कोरिया, जपान, तुर्की, इटली, युएई आणि तैवानमध्ये पेट्रोलच्या किंमती घटल्या आहेत. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठा भडका उडाल्यानंतर 17 ऑक्टोबरपासून पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्यास सुरुवात झाली होता. तेव्हापासून पेट्रोल 6.45 रुपयांनी आणि डिझेल 4.42 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 



 

Web Title: Due to the 'petrol prices', petrol and diesel prices have come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.