शाही इमामाच्या फतव्यामुळे माझा पराभव किरण बेदी यांचा दावा
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:53+5:302015-02-11T23:19:53+5:30
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी आम आदमी पार्टीला मतदान करण्याबाबत जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काढलेल्या फतव्यामुळेच आपला पराभव झाला, असा दावा भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या पराभूत उमेदवार किरण बेदी यांनी बुधवारी केला. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

शाही इमामाच्या फतव्यामुळे माझा पराभव किरण बेदी यांचा दावा
न ी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी आम आदमी पार्टीला मतदान करण्याबाबत जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काढलेल्या फतव्यामुळेच आपला पराभव झाला, असा दावा भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या पराभूत उमेदवार किरण बेदी यांनी बुधवारी केला. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.पूर्व दिल्लीतील भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कृष्णानगर मतदारसंघातून त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. मतदानाच्या पूर्वसंध्येला ६ फेब्रुवारी रोजी शाही इमाम यांनी मुस्लीम मतदारांना केलेल्या आवाहनाचा निकालावर काय परिणाम झाला याबाबत निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे, असे मत त्यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मतमोजणीत सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आपण आघाडीवर होतो. परंतु मुस्लिमबहुल भागातील मतांची मोजणी सुरू होताच आपली पीछेहाट झाली, असा बेदी यांचा दावा आहे. कृष्णानगरमध्ये बेदी यांना त्यांचे प्रतिस्पर्धी आपचे उमेदवार एस. के. बग्गा यांनी २,२७७ मतांनी पराभूत केले. (वृत्तसंस्था)