विरारमध्ये सफाई कामगारांचा मृत्यू; मानवाधिकार आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 09:54 AM2024-04-14T09:54:11+5:302024-04-14T09:54:20+5:30

विरारमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सफाई करीत असताना गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला.

Death of scavengers in Virar Notice of Human Rights Commission | विरारमध्ये सफाई कामगारांचा मृत्यू; मानवाधिकार आयोगाची नोटीस

विरारमध्ये सफाई कामगारांचा मृत्यू; मानवाधिकार आयोगाची नोटीस

नवी दिल्ली: विरारमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सफाई करीत असताना गुदमरून चार कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकार व पोलिस महासंचालकांना स्युओमोटो नोटीस बजावली आहे.

आयोगाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार
आठवड्यांत स्थितीदर्शक अहवाल सादर करा. घातक सफाई कामाबाबत काळजी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच मानवाधिकार आयोगाचे सल्लापत्र यांच्या अंमलबजावणीबाबत काय कार्यवाही करण्यात आली याचा समावेश अहवालात असायला हवा, असे आयोगाने म्हटले आहे.

Web Title: Death of scavengers in Virar Notice of Human Rights Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Virarविरार