1993 सारखा मुंबई बॉम्बस्फोट पुन्हा घडवण्याच्या तयारीत दाऊद इब्राहिम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 09:27 AM2017-10-05T09:27:46+5:302017-10-05T11:48:19+5:30

1993 मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड कुख्यात डॉन दाऊन इब्राहिम 24 वर्षांनंतर तशाच प्रकारच्या घातपाताचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Dawood Ibrahim was ready to revive the 1993 Mumbai blasts | 1993 सारखा मुंबई बॉम्बस्फोट पुन्हा घडवण्याच्या तयारीत दाऊद इब्राहिम 

1993 सारखा मुंबई बॉम्बस्फोट पुन्हा घडवण्याच्या तयारीत दाऊद इब्राहिम 

Next

मुंबई - 1993 मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड कुख्यात डॉन दाऊन इब्राहिम 24 वर्षांनंतर तशाच प्रकारच्या घातपाताचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी पाकिस्तानात राहणार दाऊदचा भाऊ आणि भारतातील त्याच्या साथीदारामधील झालेले बोलणे ट्रेस केले आहे. दाऊदच्या या ब्लॅक फ्रायडे प्लॉटबाबत केंद्र सरकारलाही माहिती देण्यात आली आहे. 

'टाइम्स नाऊ' वृत्त वाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, दाऊदच्या या हेतूंवरुन स्पष्ट होत आहे की, भारतातील सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली ठिकाणी त्याचे हस्तक आजही आहेत. अशा परिस्थितीत दाऊदच्या या जवळच्या माणसांच्या मुसक्या आवळण्यासाठी  पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांसमोरील आव्हानं वाढत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पळपुटा दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कंपनीतील काही लोकं आजही भारतात  त्याचे वाईट हेतू कृत्यात उतरवण्याचा कट रचत आहेत. अशातच मुंबई पोलिसांद्वारे दाऊदचा पाकिस्तानात असलेला भाऊ आणि भारतातील त्याच्या हस्तकांमध्ये सांकेतिक भाषेत झालेलं संभाषण मुंबई पोलिसांनी ट्रेस केलं असून याद्वारे मोठा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली आहे. असे म्हटले जात आहे की या संभाषणातून मुंबई पोलिसांना महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळाली आहे. 

दरम्यान, दाऊदचा भाऊ इक्बाल आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध खंडणीचा तिसरा गुन्हा मंगळवारी ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणातील फिर्यादी हा ठाण्यातील भाईंदर येथील बिल्डर आहे. खार येथील एका व्यावसायिकाची गोराई येथे 38 एकर जमीन होती. या जमिनीचा सौदा भाईंदर येथील बिल्डरने केला होता. त्यासाठी बिल्डरने व्यावसायिकास 2 कोटी रुपये अग्रिम दिले होते. खरेदीचा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे व्यावसायिकाने भाव वाढवून मागितल्याने वाद झाला. जमिनीचा ताबा मिळत नसल्याने बिल्डरने मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, दरम्यानच्या काळात बिल्डरच्या भागिदाराच्या नातेवाईकाने जमिनीचा वाद मिटविण्याकरीता चर्चेसाठी बोलविले. फिर्यादी बिल्डर चर्चेसाठी गेला असता तिथे त्याच्या भागिदाराच्या नातेवाईकासह आणखी तीन अनोळखी इसम होते. दोन दिवसांनी त्यांनी बिल्डरला पुन्हा ठाण्यातील टेंभी नाक्यावरील एका हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलविले.

त्यावेळी त्यापैकी एकाच्या मोबाईल फोनवर इक्बाल कासकरने बिल्डरला धमकावले. दाऊद इब्राहिम आणि अनिस इब्राहिम यांनी ही जागा घेतली असल्याचे सांगून, या व्यवहारातून बाजुला होण्यास कासकरने बिल्डरला बजावले. त्यानंतर कासकरने बिल्डरला भेटीसाठी बोलावून जमिनीची संपूर्ण माहिती त्याच्याकडून घेतली.  2012-13 साली बिल्डरला वेळोवेळी परदेशातून धमकीचे फोन आले.  जुलै 2016 मध्ये फिर्यादी बिल्डर ठाणो न्यायालयात असताना त्याला परदेशातून प्रायव्हेट नंबरवरून फोन आला. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस बोलत त्याने बिल्डरला सांगितले. जमिन मालकास दिलेले 2 कोटी रुपये मी घेतले असून, तुला जिवंत राहायचे असेल या व्यवहारातून बाजुला हो आणि 1 कोटी रुपये इक्बाल कासकरकडे एक आठवडय़ाच्या आत पाठव, असे त्याने बिल्डरला धमकावले. न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेतला नाही तर दाऊदची माणसं तुला संपवतील अशी धमकी अनिस इब्राहिमने यावेळी बिल्डरला दिली. बिल्डरने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार ठाणोनगर पोलिसांनी दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम आणि इक्बाल कासकरसह सहा जणांविरूद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला. 

Web Title: Dawood Ibrahim was ready to revive the 1993 Mumbai blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.