चिंताजनक! ओमायक्रॉनचा ५ वा व्हेरिएंट, दररोज ३ हजार रुग्ण; बूस्टर डोस घेतला नसेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:19 PM2023-04-01T12:19:14+5:302023-04-01T12:19:53+5:30

ओमायक्रॉनच्या या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी कुठल्याही लसीची गरज नाही पण काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Coronavirus: 5th variant of Omicron, 3 thousand patients per day; If booster dose is not taken... | चिंताजनक! ओमायक्रॉनचा ५ वा व्हेरिएंट, दररोज ३ हजार रुग्ण; बूस्टर डोस घेतला नसेल तर...

चिंताजनक! ओमायक्रॉनचा ५ वा व्हेरिएंट, दररोज ३ हजार रुग्ण; बूस्टर डोस घेतला नसेल तर...

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतात कोविड १९ चे रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. मागील २ दिवसांपासून सातत्याने ३ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट ३ टक्के आहे. कोरोना स्थिती वेगाने बदलत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नवीन रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा XBB.1.16 व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे. आता कोरोनापासून वाचण्यासाठी कोविडची चौथी लस घ्यावी लागणार का असा प्रश्न उपस्थित आहे.

याबाबत तज्ज्ञ सांगतात की, ओमायक्रॉन XBB.1.16 व्हेरिएंटमुळे अनेकजण संक्रमित होत आहेत. भारतात युद्धपातळीवर लसीकरण केले जात आहे. लोकांना बूस्टर डोसही दिला जातोय. त्यातून इम्युनिटी वाढीस मदत होईल. कोविडला हरवल्यानंतर लोकांमध्ये इम्युनिटी स्टॉँग झाली आहे. इम्युनिटीवर बोलायचं झाले तर ती दोन स्तरावर काम करते. सामान्यांना व्हायरसपासून वाचवते आणि या संक्रमणातून होणाऱ्या गंभीर परिणामांपासून संरक्षित करते. 

अलर्ट राहावं लागेल....
ओमायक्रॉनच्या या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी कुठल्याही लसीची गरज नाही पण  काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा संक्रमणात वाढ होईल तेव्हा लोकांना जास्त अलर्ट राहावे लागेल. कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण मोठे हत्यार आहे. लोकांना तिसऱ्या डोससह बूस्टर डोसही देणे गरजेचे आहे. कोरोनाचा पूर्ण डोस फुस्फुस्साच्या गंभीर आजार, निमोनियाही रोखण्यास मदत करतो. आता कोविडच्या जाळ्यात अडकलेल्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरज नाही. बूस्टर डोस एक वर्षापूर्वी उपलब्ध केला होता. परंतु आजही अनेक लोकांनी बूस्टर डोस घेतले नाहीत. 

भारतात वापरण्यात येणारी व्हॅक्सिन ३ वर्षापूर्वी विकसित केली होती. आता कुठलीही व्हॅक्सिन नव्या व्हेरिएंटसाठी प्रभावी ठरणार नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ११०० पेक्षा जास्त सब-टाइप आहे. जी व्हॅक्सिन आधी उपलब्ध आहे ती रोखण्यासाठी पुरेसी आहे. त्यामुळे चौथ्या व्हॅक्सिनची गरज नाही असंही तज्त्रांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पहिल्या घेतलेल्या लसीच्या ३ डोसने गंभीर आजारापासून सुटका होऊ शकते. कोरोनाच्या पूर्ण लसीकरणामुळे लोक सुरक्षित झाले आहेत. सध्या चौथ्या लसीची गरज भासणार नाही. ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी इंट्रो नेजल व्हॅक्सिन घेणे फायदेशीर आहे. ही लस खूप काळ फुस्फुसाला सुरक्षित ठेऊ शकतात. 

Web Title: Coronavirus: 5th variant of Omicron, 3 thousand patients per day; If booster dose is not taken...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.