मुलं म्हणाली, 'चौकीदार चोर है'... प्रियंका गांधी हसल्या अन् कायद्याच्या कचाट्यात फसल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 01:06 PM2019-05-02T13:06:49+5:302019-05-02T13:07:02+5:30

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासमोर अमेठीत काही लहानग्यांनी 'चौकीदार चोर है'ची घोषणा दिली.

congress priyanka gandhi response to children abusing pm modi splits twitter | मुलं म्हणाली, 'चौकीदार चोर है'... प्रियंका गांधी हसल्या अन् कायद्याच्या कचाट्यात फसल्या!

मुलं म्हणाली, 'चौकीदार चोर है'... प्रियंका गांधी हसल्या अन् कायद्याच्या कचाट्यात फसल्या!

Next

नवी दिल्लीः काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासमोर अमेठीत काही लहानग्यांनी 'चौकीदार चोर है'ची घोषणा दिली. लहान मुलं चौकीदार चौर हैच्या घोषणा देत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. त्यानंतर प्रियंका गांधी यांच्या विरोधात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियंका गांधींची तक्रार केली आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ हा 1 मे रोजीचा आहे. व्हिडीओवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनीही प्रियंका गांधींवर टीका केली आहे. व्हिडीओमध्ये लहान मुलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करत असल्याचं ऐकायलं मिळतंय.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं व्हिडीओसंदर्भात लिहिलं आहे की, प्रियंका गांधी यांच्या समोर लहान मुलं ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत आहे, त्यांना शिवीगाळ करत आहेत, ती मुलांच्या विकासासाठी चांगली गोष्ट नाही. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला पत्र लिहून लहान मुलांना निवडणूक प्रचार आणि निवडणुकीसंदर्भातील गोष्टींमध्ये सामील करू घेऊ नये, हे तुम्ही सुनिश्चित करण्याचं सुचवलं आहे. लहान मुलांचा वापर कोणतीही चिठ्ठी, घोषणबाजी आणि रॅलीमध्ये केला जाऊ नये, अशी मागणीही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं केली आहे. तसेच या प्रकरणात प्रियंका गांधींवर कारवाई करावी, असंही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला म्हटलं आहे. 


प्रियंका गांधींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत लहान मुलं चौकीदार चोर है अशी घोषणा देत आहेत. तसेच मोदीसंदर्भात खालच्या पातळीची भाषा ही मुलं करत आहेत. मुलं चौकीदार चौर है असं म्हटल्यावर प्रियंका गांधी हसत असल्याचंही पाहायला मिळतंय. तसेच प्रियंका गांधी मुलांना पहिली घोषणा ठीक आहे, पण दुसरी चांगली नसल्याचंही सांगत आहेत. ती मुलं राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणाही देत होती

Web Title: congress priyanka gandhi response to children abusing pm modi splits twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.