सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; आमदार, नेत्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 11:25 AM2018-04-11T11:25:59+5:302018-04-11T11:25:59+5:30

अमित शहांच्या उपस्थितीत भाजपामध्ये करणार प्रवेश

Congress MLA and MLC from Raebareli quit party, 'unhappy' with its indifference to local leaders | सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; आमदार, नेत्यांचे राजीनामे

सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; आमदार, नेत्यांचे राजीनामे

Next

रायबरेली :   काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीं यांना मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशामधील त्यांचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदार संघातील काँग्रेस आमदार आणि नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. सोनिया गांधींना हा जबर धक्का मानला जातोय.  

उत्तरप्रदेशमधील काँग्रेस विधान परिषदेचे आमदार दिनेश सिंगनी, रायबरेतील हरचंदपूरचे काँग्रेस आमदार राकेश सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. दिनेश सिंग सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात. या दोन मोठ्या नेत्यांबरोबरच रायबरेली जिल्हा पंचायतचे अध्यक्ष अवधेश सिंग यांनीही राजीनामा दिला आहे. अवधेश सिंग हे उत्तर प्रदेशमधले काँग्रेसचे एकमेव जिल्हा पंचायत अध्यक्ष होते.  त्याचप्रमाणे रायबरेलीच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमधल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

विधान परिषद निवडणुकीआधी अमित शहा सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशला येणार आहेत. त्यावेळी राकेश सिंग, अवधेश सिंग यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. 

Web Title: Congress MLA and MLC from Raebareli quit party, 'unhappy' with its indifference to local leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.