काँग्रेस नेत्याचं लाजिरवाणं कृत्य! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पकडला महिला आमदाराचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 08:39 AM2017-08-19T08:39:10+5:302017-08-19T09:22:35+5:30

कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने जाहीर कार्यक्रमात महिला आमदाराचा हात पकडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Congress leader held hand in hand for independence | काँग्रेस नेत्याचं लाजिरवाणं कृत्य! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पकडला महिला आमदाराचा हात

काँग्रेस नेत्याचं लाजिरवाणं कृत्य! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पकडला महिला आमदाराचा हात

Next
ठळक मुद्देकाँग्रेस नेते टीपी रमेश यांनी शेजारी बसलेल्या आमदार वीणा अचय्या यांचा हात पकडला.कर्नाटकाच्या कोडागू जिल्ह्यातील मादीकेरी शहरात ही घटना घडली.

कोडागू, दि. 19 - कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने जाहीर कार्यक्रमात महिला आमदाराचा हात पकडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेते टीपी रमेश यांनी शेजारी बसलेल्या आमदार वीणा अचय्या यांचा हात पकडला. रमेश यांनी अचानक सर्वांसमक्ष अशी कृती केल्याने वीणा गोंधळून गेल्या. त्या अस्वस्थ झाल्याचे भाव त्यांच्या चेह-यावर स्पष्टपण दिसत होते. पण सार्वजनिक कार्यक्रम असल्याने त्यावेळी लगेच कोणीतीही नाराजी प्रकट न करता त्यांनी अलगदपणे रमेश याचा हात बाजूला केला. 

कर्नाटकाच्या कोडागू जिल्ह्यातील मादीकेरी शहरात ही घटना घडली. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला असून, चहूबाजूंनी रमेश यांच्यावर जोरदार टीका होत आहे. रमेश यांनी जाहीरपणे अशी गैरवर्तणूक केल्याने आपल्याला दु:ख झाले असून, एकप्रकारचा धक्का बसला आहे असे आमदार वीणा अचय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

काही दिवसांपूर्वी धर्मास्थळा येथे आयोजित केलेल्या आरोग्यशिबिराबद्दल आम्ही बोलत होते. त्यावेळी रमेश यांनी अचानक माझा हात  पकडला व आपले वजन घटल्याचे सांगितले. त्यांच्या या कृतीमुळे मी अस्वस्थ झाले मी लगेच त्यांचा हात बाजूला केला. त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमात आम्ही दोघे एकमेकांशी एक शब्दही बोललो नाहीत असे वीणा यांनी सांगितले. 

यापूर्वी कोणीही पक्षात माझ्या बरोबर असे वागलेले नाही किंवा त्रास दिलेला नाही असे वीणा यांनी सांगितले. पहिल्यांदा माझ्याबरोबर अशी घटना घडली. कार्यक्रमावरुन घरी परतल्यानंतर मला  रमेश यांचा फोन आला. त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल माझी माफी मागितली. मी त्यांच्यासाठी बहिणीसमान आहे असे त्यांनी मला सांगितले असे वीणा म्हणाल्या. रमेश यांच्यावर कारवाईसाठी आपण काँग्रेस हायकमांडबरोबर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

दिल्लीतही महिलेचा विनयभंग
दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक जबरदस्तीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पीडित महिलेने तक्रार केली म्हणून तिलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. 

Web Title: Congress leader held hand in hand for independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.