देशात रामाची लाट नाही; राम मंदिर सोहळा BJP चा राजकीय कार्यक्रम; राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:01 PM2024-01-23T18:01:11+5:302024-01-23T18:01:40+5:30

राहुल गांधी यांच्याविरोधात असाममध्ये FIR दाखल झाली, यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर निशाणा साधला.

Congress Bharat Jodo Nyay Yatra: There is no wave of Rama in the country; Ram Mandir is BJPs political event, Rahul Gandhi criticizes | देशात रामाची लाट नाही; राम मंदिर सोहळा BJP चा राजकीय कार्यक्रम; राहुल गांधींचे टीकास्त्र

देशात रामाची लाट नाही; राम मंदिर सोहळा BJP चा राजकीय कार्यक्रम; राहुल गांधींचे टीकास्त्र

Congress Bharat Jodo Nyay Yatra: मणिपूरमधून सुरू झालेली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. गुवाहाटीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या निर्देशानुसार, पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, असाममध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. 

देशात रामाची लाट नाही
श्रीराम मंदिर सोहळ्याला त्यांनी भाजपचा राजकीय कार्यक्रम म्हटले. तसेच, देशात 'रामाची लाट' आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, अशी कोणतीही लाट नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून वर्णन केले. तसेच, राज्यात प्रचंड बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई आहे. शेतकरी चिंतेत असून तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. हेच मुद्दे आम्ही मांडत आहोत. युवा न्याय, सहभाग, महिला न्याय, शेतकरी न्याय आणि कामगार न्याय, हे आमच्या यात्रेचे पाच स्तंभ आहेत. येत्या दीड महिन्यात काँग्रेस पक्ष यात्रेदरम्यान या मुद्द्यांवर आपली मते मांडेल, असंही राहुल यावेळी म्हणाले. 

एकीकडे मोदी-RSS अन् दुसरकडे इंडिया 
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखणे, महाविद्यालयात जाण्यापासून रोखणे किंवा पदयात्रा थांबवणे, यातून त्यांची भीती दिसून येत आहे. पण, आम्ही घाबरणार नाही. भाजपवाले यात्रेत अडथळे निर्माण करतात, तेव्हा ते प्रत्यक्षात यात्रेला मदत करत असतात. यात्रा थांबवावी, अशी माझी इच्छा आहे. आम्हाला महाविद्यालयात जाण्यापासून रोखले पाहिजे, त्यानंतर संपूर्ण विद्यार्ती बाहेर पडले आणि आमचे ऐकले. आज एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहे, तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे आणि आमच्या इंडिया आघाडीकडे जवळपास 60 टक्के मते आहेत. 

Web Title: Congress Bharat Jodo Nyay Yatra: There is no wave of Rama in the country; Ram Mandir is BJPs political event, Rahul Gandhi criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.