ब्लॅक मनी: स्वित्झर्लंड भारताला देणार खातेधारकांची माहिती

By admin | Published: June 16, 2017 06:35 PM2017-06-16T18:35:47+5:302017-06-16T18:56:03+5:30

स्वित्झर्लंड सरकारनं भारतासह अन्य 40 देशांशी वित्तीय खाते, काळा पैशासंबंधित सूचना आदान-प्रदान करण्यासाठीच्या कराराला शुक्रवारी मंजुरी दिली आहे.

Black Money: Swiss Account Holders Information for Switzerland | ब्लॅक मनी: स्वित्झर्लंड भारताला देणार खातेधारकांची माहिती

ब्लॅक मनी: स्वित्झर्लंड भारताला देणार खातेधारकांची माहिती

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - स्वित्झर्लंड सरकारनं भारतासह अन्य 40 देशांशी वित्तीय खाते, काळा पैशासंबंधित सूचना आदान-प्रदान करण्यासाठीच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली आहे. आता या देशांना गोपनीयता आणि सूचनांच्या सुरक्षेचं पालन करावं लागणार आहे. जागतिक पातळीवर इतर देशांशी करासंबंधी माहितीचे आदान-प्रधान करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला स्वित्झर्लंडच्या संघीय परिषदेनं मंजुरी दिली आहे. स्वित्झर्लंड सरकार वर्षं 2018पासून या सूचना अंमलात आणणार आहे. तसेच या सूचनेअंतर्गत आकड्यांची आदानप्रदान 2019मध्ये होणार आहे. स्वित्झर्लंडची संघीय परिषद सूचनांची देवाण-घेवाणीची व्यवस्था सुरू करण्यासंबंधीची तारीख लवकरच भारताला कळवणार आहे.

परिषदेच्या मसुद्यानुसार, यासाठी तिथे कोणतंही जनमत संग्रह घेण्यात येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर या सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. काळा पैशांचा मुद्दा हा भारतासाठी आता सार्वजनिक झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय नागरिक स्वित्झर्लंड बँकेत काळा पैसा जमा करत असल्याची चर्चा आहे.
(स्विस बँकांमधला भारतीयांचा पैसा 10 टक्क्यांनी घटला)
स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या काही वर्षांत 10 टक्क्यांनी घसरून 1.8 अब्ज स्विस फ्रँक (12,615 कोटी रुपये) इतकी झाली आहे. भारत सरकारसह अन्य काही देशांनी स्विस बँकांमध्ये दडवण्यात येणा-या काळ्या पैशाबाबत आक्रमक भूमिका घेत केलेल्या विरोधाला फळ येताना दिसत आहे. विशेष म्हणजे जगभरातून स्विस बँकेत येणारा पैशाचा ओघ वाढला असताना भारतीयांची पुंजी मात्र घटली आहे. स्विस बँकांमध्ये जगभरातल्या गुंतवणूकदारांनी ठेवलेली रक्कम या वर्षी 90 लाख कोटी रुपयांवरून वाढून 103 लाख कोटी किंवा 1.60 लाख कोटी डॉलर्स एवढी झाली आहे.

ताज्या माहितीनुसार, 2014च्या अखेरीस भारतीयांनी स्विस बँकेत ठेवलेली एकूण रक्कम 1776 दशलक्ष स्विस फ्रँक होती, जी एका वर्षापूर्वी 1952 दशलक्ष स्विस फ्रँक होती. तर भारतीयांचा पैसा स्विस बँकेत ठेवणा-या अन्य वित्तसंस्थांची ठेवही या कालावधीत 77.3 दशलक्ष स्विस फ्रँकवरून घसरून 38 दशलक्ष स्विस फ्रँक एवढी झाल्याचे स्विस सेंट्रल बँकेने जाहीर केले होते

Web Title: Black Money: Swiss Account Holders Information for Switzerland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.