मोठी बातमी : पोरबंदरमध्ये ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, 4 संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 10:36 AM2023-06-10T10:36:36+5:302023-06-10T10:38:40+5:30

याशिवाय, एटीएसने सूरतमधूनही इस्लामिक स्टेट ऑफ खुरासान प्रोव्हिंस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका महिलेलाही अटक केली आहे.

Big News ISIS terror module busted in Porbandar Gujarat, 4 suspects arrested | मोठी बातमी : पोरबंदरमध्ये ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, 4 संशयितांना अटक

मोठी बातमी : पोरबंदरमध्ये ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, 4 संशयितांना अटक

googlenewsNext

 
पोरबंदर - गुजरातमधील पोरबंदर येथे दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत, एका दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. हे लोक एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते, असा आरोप त्यांच्यावर आहे. यो लोकांच्या अटकेसाठी एटीएसच्या पथकाने कालपासून पोरबंदरमध्ये तळ ठोकला होता.

या कारवाईसंदर्भात एटीएसचे अधिकारी आज एक पत्रकार परिषद घेतील, असे बोलले जात आहे. याच बरोबर, एटीएसने सूरतमधूनही इस्लामिक स्टेट ऑफ खुरासान प्रोव्हिंस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका महिलेलाही अटक केली आहे. एटीएसने या महिलेला पोलिसांच्या मदतीने लालगेट भागातू अटक केली आहे. तिला पोरबंदरला नेण्यात आले आहे. इस्लामिक स्टेट ऑफ खुरासान ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवाया करते, असे बोलले जाते.

एटीएसने अटक केलेल्या महिलेचे लग्न दक्षिण भारतात झाले आहे. तिच्या कटुंबातील एक व्यक्ती सरकारी नौकरीही करते. एटीएसचे अधिकारी या महिलेसंदर्बात अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ती दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कशी आली? यासंदर्भात एटीएसचे अधिकारी माहिती मिळवत आहेत. तसेच, एटीएसने पोरबंदरमधून 3 संशयितांना अटक केली आहे. या तिघांनीही संबंधित महिलेचे नाव सागितले आहे. 

महत्वाचे म्हणजे, अटक केलेल्यांमध्ये एक जण परदेशी नागरिक आहे. डीआयजी दीपन भद्रन, एसपी सुनील जोशी, डीवायएसपी केके पटेल, डीवायएसपी शंकर चौधरी यांच्या सह अेक वरिष्ट अधिकारी पोरबंदर येथे पोहोचले आहेत. आज एटीएस अथवा गुजरात पोलीसमधील अधिकारी या संपूर्ण ऑपरेशनसंदर्भात अनाउंसमेंट करू शकतात.

Web Title: Big News ISIS terror module busted in Porbandar Gujarat, 4 suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.