संदेशखाली प्रकरणी ममता बॅनर्जींना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले CBI चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 05:05 PM2024-03-05T17:05:05+5:302024-03-05T17:05:39+5:30

Sandeshkhali case : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवर झालेला अत्याचार आणि हिंसाचार प्रकरणामध्ये आज कलकत्ता हायकोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. हायकोर्टाने येथील एकूण तीन प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपी शाहजहाँ शेख यालाही आज संध्याकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Big blow to Mamata Banerjee in Sandeshkhali case, High Court orders CBI probe | संदेशखाली प्रकरणी ममता बॅनर्जींना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले CBI चौकशीचे आदेश

संदेशखाली प्रकरणी ममता बॅनर्जींना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले CBI चौकशीचे आदेश

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवर झालेला अत्याचार आणि हिंसाचार प्रकरणामध्ये आज कलकत्ता हायकोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या प्रकरणी कठोर भूमिका घेताना हायकोर्टाने येथील एकूण तीन प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपी शाहजहाँ शेख यालाही आज संध्याकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाचा हा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  

संदेशखालीमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली झालेलं तीव्र आंदोलन आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांनंतप अखेर ५५ दिवसांपासून बेपत्ता असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहाँ शेख याला पोलिसांनी अटक केली होती. शाहजहाँ शेख याच्यावर लैंगिक शोषण आणि जमिनी हडप केल्याचे आरोप आहेत.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (दक्षिण बंगाल) सुप्रतिम सरकार यांनी सांगितले की, शेख याला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सुंदरवनाच्या बाहेरील परिसरात असलेल्या एका घरातून अटक करण्यात आली. हे ठिकाण संदेशखालीपासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. शेख हा इथे त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत लपलेला होता, असे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आल्यानंतर शेख याला कोर्टात हजर केले असता त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, संदेशखाली प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर जोरदार टीका केली होती. संदेशखालीतील अत्याचाराविरोधात संपूर्ण देशामध्ये संतापाचं वातावरण आहे, असे मोदी म्हणाले होते. तसेच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्याचं आवाहनही जनतेला केलं होतं.   

Web Title: Big blow to Mamata Banerjee in Sandeshkhali case, High Court orders CBI probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.