तब्बल 100 महिलांचं लैंगिक शोषण करणा-या ढोंगी बाबाला अटक

By Admin | Updated: May 24, 2016 13:30 IST2016-05-24T12:44:21+5:302016-05-24T13:30:22+5:30

- तब्बल 100 महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ढोंगी बाबाला उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Baba was arrested for allegedly sexually assaulting 100 women | तब्बल 100 महिलांचं लैंगिक शोषण करणा-या ढोंगी बाबाला अटक

तब्बल 100 महिलांचं लैंगिक शोषण करणा-या ढोंगी बाबाला अटक

>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - तब्बल 100 महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ढोंगी बाबाला उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथून पोलिसांनी अटक केली आहे.  राम शंकर तिवारी उर्फ परमानंद हा ढोंगी बाबा अपत्य प्राप्तीची आस असणा-या निपुत्रिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 
हा ढोंगी साधू बाबा महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करीत होता. मागील काही दिवसांपूर्वी एका पीडित महिलेचा आणि आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये बाबा पीडित तरुणीला धमकी देत असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वीही त्या ढोंगी बाबाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्याच्याविरोधात कोणीही कारवाई करत नव्हतं. अखेर नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे शंभर पापांचे घडे भरलेल्या या भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Baba was arrested for allegedly sexually assaulting 100 women