श्रीनगरमध्ये जवळपास 22 वर्षांनी लष्कराचे बंकर हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 22:29 IST2016-04-19T22:29:12+5:302016-04-19T22:29:12+5:30
श्रीनगरमधला गेल्या 22 वर्षांपासूनचा हंडवाडा चौकातील बंकर मंगळवारी हटवण्यात आला आहे.

श्रीनगरमध्ये जवळपास 22 वर्षांनी लष्कराचे बंकर हटविले
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. १९- श्रीनगरमधला गेल्या 22 वर्षांपासूनचा हंडवाडा चौकातील बंकर मंगळवारी हटवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या छेडछाडीमुळे मोठा संघर्ष झाला होता. या संघर्षात तीन जणांचा मृत्यूही झाला होता. या छेडछाडीप्रकरणी एका व्यक्तीस अटकही करण्यात आली.
यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी हा बंकर हटवण्यासाठी आंदोलन छेडले होते. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आल्यानं हे बंकर हटवण्यात आले आहेत. आंदोलनामुळे प्रशासनानं संचारबंदीही लागू केली होती.
मात्र आज परिस्थिती हळूहळू सुस्थितीत आल्यानं संचारबंदी शिथिल करण्यात आली. लष्करानं बंकर रिकामे केल्यानंतर स्थानिकांनी ते तोडून टाकले. यावेळी श्रीनगरमधल्या लोकांनी बंकर हटवल्यामुळे मोठा जल्लोषही केला.