पहिली रिस्क यशस्वी ठरली! सीरमने केली आणखी एक रामबाण लस आणण्याची तयारी

By कुणाल गवाणकर | Published: January 30, 2021 03:05 PM2021-01-30T15:05:56+5:302021-01-30T15:09:34+5:30

देशाला लवकरच कोरोनावरील तिसरी लस मिळण्याची शक्यता; पुनावालांचं ट्विट

Another Covid vaccine in India Adar Poonawalla 'hopes to launch COVOVAX by June 2021 | पहिली रिस्क यशस्वी ठरली! सीरमने केली आणखी एक रामबाण लस आणण्याची तयारी

पहिली रिस्क यशस्वी ठरली! सीरमने केली आणखी एक रामबाण लस आणण्याची तयारी

googlenewsNext

मुंबई: देशात सर्वात आधी सीरमच्या कोविशील्ड लसीला परवानगी मिळाली. सीरमनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहाय्यानं कोविशील्ड लस तयार केली आहे. देशात सध्या ही लस वापरली जात आहे. त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लवकरच कोरोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत. 

कोरोना लस सर्वांना मिळेपर्यंत...; बिल अन् मेलिंडा गेट्स यांनी सांगितला पुढचा धोका

यंदाच्या वर्षात जून महिन्यात सीरम कोरोनावरील दुसरी लस लॉन्च करेल, अशी माहिती पुनावाला यांनी ट्वट करून दिली आहे. या लसीला मान्य दिल्यास ती देशातील तिसरी कोरोना लस ठरेल. 'सीरमनं नोवावॅक्ससोबतच्या भागिदारीतून तयार केलेल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष उत्तम आहेत. भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. जून २०२१ मध्ये कोवोवॅक्स लॉन्च करू अशी आशा आहे,' असं पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



सध्याच्या घडीला पुणेस्थित सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसींचा वापर देशात सुरू आहे. कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादस्थित भारत बायोटेकनं भारत वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीच्या सहकार्यानं केली आहे. कोवॅक्सिन लस पूर्णपणे भारतीय आहे. तर कोविशील्ड लसीसाठीचं  संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं केलं आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीचं उत्पादन करत आहे.

गुड न्यूज! तिसरी कोरोना लस लवकरच; भारतात टाटा ग्रुप करणार 'मॉडर्ना' लॉन्च?

सीरम जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सिरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.

Read in English

Web Title: Another Covid vaccine in India Adar Poonawalla 'hopes to launch COVOVAX by June 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.