Anand Mahindra: आनंद महिंद्रा कुणाला म्हणाले 'देश की धडकन'?, तिरंगा रंगात रंगले अन् साजरा केला 'हर घर तिरंगा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 04:52 PM2022-08-12T16:52:40+5:302022-08-12T16:54:25+5:30

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत.

anand mahindra shares photo with national flag har ghar tiranga campaign azadi ka amrit mahotsav | Anand Mahindra: आनंद महिंद्रा कुणाला म्हणाले 'देश की धडकन'?, तिरंगा रंगात रंगले अन् साजरा केला 'हर घर तिरंगा'!

Anand Mahindra: आनंद महिंद्रा कुणाला म्हणाले 'देश की धडकन'?, तिरंगा रंगात रंगले अन् साजरा केला 'हर घर तिरंगा'!

googlenewsNext

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यातच देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही साथ दिली आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. समाजातील विविध घडामोडींची ते आवर्जुन दखल घेत असतात आणि त्यावर आपली भूमिका देखील स्पष्ट करत असतात. आनंद महिंद्राच्या ट्विट किंवा फेसबुक पोस्टचीही खूप चर्चा होत असते. आज पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी एक खास पोस्ट केली आहे. आनंद महिंद्रा यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाला साथ देत एक फोटो ट्विट केला आहे. यात ते राष्ट्रध्वज पकडून उभे आहेत आणि त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसून येत आहे. 

देशाची टपाल व्यवस्था 'देश की धडकन'
मुंबईच्या पोस्टमास्तर जनरल यांच्याकडून आनंद महिंद्रा यांना गिफ्ट म्हणून राष्ट्रध्वज प्राप्त झाला आहे. मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रध्वज दिला. याबाबत पोस्ट विभागाचे आभार व्यक्त करताना आनंद महिंद्रा यांनी स्वाती पांडे यांच्यासोबत फोटो ट्विट केला आहे. यात आनंद महिंद्रा यांनी देशातील पोस्ट विभागाचं कौतुक करताना टपाल व्यवस्था देशाची 'धडकन' असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: anand mahindra shares photo with national flag har ghar tiranga campaign azadi ka amrit mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.