थोडक्यात बचावलं एअर इंडियाचं विमान, अन्यथा घडला असता अनर्थ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:54 AM2019-04-25T10:54:16+5:302019-04-25T10:55:24+5:30

दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे.

Air India Delhi to San Francisco (Boeing 777) flight caught fire in Auxiliary Power Unit(APU) | थोडक्यात बचावलं एअर इंडियाचं विमान, अन्यथा घडला असता अनर्थ 

थोडक्यात बचावलं एअर इंडियाचं विमान, अन्यथा घडला असता अनर्थ 

Next

नवी दिल्ली- दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे. एअर इंडियाचं बोइंग 777 विमानाला अचानक आग लागली. विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच अॅक्जिलियरी पॉवर युनिटमध्ये आग लागली. विमानाला आग लागली त्यावेळी विमानात कोणताही प्रवासी नव्हता. ही दुर्घटना एअर इंडियाच्या विमान क्रमांक बी777-200एलआरमध्ये झाली आहे.

दुर्घटनाग्रस्त विमान दिल्लीहून अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होतं. विमान तळावर जेव्हा याची दुरुस्ती सुरू होती. त्यावेळीच विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. विमानाची दुरुस्ती होत असल्यानं त्यावेळी कोणताही प्रवासी त्यात नव्हता. परंतु विमान दुरुस्त झाल्यानंतर लागलीच उड्डाण भरणार होतं. विमानाला आग लागल्याकारणानं त्याचं उड्डाण रद्द करण्यात आलं. 25 एप्रिलला रवाना होणारं विमान आता गुरुवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान उड्डाण भरणार आहे.


बोइंग विमानांसंदर्भातील अनेक दुर्घटना केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात समोर आल्या आहेत. इथियोपियाचं बोइंग विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभरात अनेक विमान कंपन्यांनी बोइंग विमानाच्या उड्डाणांचं उड्डाण थांबवलं. चीन, इथियोपिया, सिंगापूरसह जगातल्या अनेक देशांनी बोइंग विमानांची सेवा बंद केली आहे.

 

 

 

Web Title: Air India Delhi to San Francisco (Boeing 777) flight caught fire in Auxiliary Power Unit(APU)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.