अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 11:46 AM2022-07-11T11:46:25+5:302022-07-11T11:47:06+5:30

Air Chief Marshal V R Chaudhari : चार वर्षांच्या नियुक्तीच्या अवधीत १३ पथके  अग्निवीरांची नोंदणी, रोजगार, मूल्यांकन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतील.

Agnipath supports IAF's long-term vision of being lean and lethal force: Air Chief Marshal V R Chaudhari | अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी

अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी

Next

नवी दिल्ली :  ‘अग्निपथ’ योजना सर्वोत्कृष्ट मनुष्यबळासोबत एक छोट्या आणि मारक दलाच्या भारतीय वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टीकोनारुप आहे. नवीन भरती योजनेमुळे वायुदलाची संचालन क्षमता कोणत्याही प्रकारे कमी करणार नाही, असे भारतीय वायुदलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी स्पष्ट केले.

चार वर्षांच्या नियुक्तीच्या अवधीत १३ पथके अग्निवीरांची नोंदणी, रोजगार, मूल्यांकन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतील. या योजनेच्या अंमलबजावणीने पेन्शन आणि अन्य खर्चात  कोणतीही कमतरता केवळ आकस्मिक असून, याला सुधारणा लागू करण्याचे कारण मानले जाऊ नये. ही योजना वायुदलाच्या  मनुष्यबळाच्या इष्टतमीकरण समुपयोगाच्या अभियानाला पुढे चालना देते, जे एक दशकांपासून चालू आहे. यानुसार आम्ही अनेक मनुष्यबळ संसाधन धोरणे आणि संघटनात्मक संरचनांचा आढावा घेतला. नवीन भरती योजनेन्वये भारतीय वायुदलाच्या  जवळपास ३ हजार पदांसाठी ७,५०,००० उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती वायुदल प्रमुखांनी दिली. 

कारगिल आढावा समितीच्या शिफारसीनुसार अंमलबजावणी

कारगिल आढावा समितीच्या शिफारशींवर क्रमश: लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. हे परिवर्तन बदलते तंत्रज्ञान, यंत्रांची गुंतागुंत, भारतीय वायुदलाचे मनुष्यबळ आणि संसाधनाच्या स्वचालन व इष्टतमीकरणासह विविध गरजा  पूर्ण करते. अग्निवीरांचे मूल्यांकन भारतीय वायुदलाला सर्वोत्कृष्ट श्रमशक्ती प्रदान करील आणि दीर्घावधीत ही योजना लोक, सशस्त्र दल आणि समग्रपणे समाजासाठी लाभकारक ठरेल, असे वायुदल प्रमुख चौधरी यांनी स्पष्ट केले.


 

Web Title: Agnipath supports IAF's long-term vision of being lean and lethal force: Air Chief Marshal V R Chaudhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.