न्यायालयाच्या पाय-या चढल्यानंतर सिंघानिया पिता-पुत्र चार भिंतींच्या आत वाद सोडवण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 11:18 AM2017-09-05T11:18:20+5:302017-09-05T11:22:16+5:30

उद्योगपती विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांनी एकत्र येऊन संपत्तीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करु अशी माहिती उच्च न्यायालयात दिली आहे

After the upheaval of the court, Singhania father and son are ready to settle disputes within four walls | न्यायालयाच्या पाय-या चढल्यानंतर सिंघानिया पिता-पुत्र चार भिंतींच्या आत वाद सोडवण्यास तयार

न्यायालयाच्या पाय-या चढल्यानंतर सिंघानिया पिता-पुत्र चार भिंतींच्या आत वाद सोडवण्यास तयार

googlenewsNext

मुंबई, दि. 5 - उद्योगपती विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांनी एकत्र येऊन संपत्तीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करु अशी माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. दोघांच्याही वकिलांनी न्यायालयात ही माहिती दिली. महत्वाचं म्हणजे न्यायालयानेच दोघांना चर्चा करुन मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता. न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोघांनाही एकत्र येऊन वादावर तोडगा काढण्यास सांगितलं होतं. हे खासगी प्रकरण असल्याने, त्याप्रमाणेच सोडवलं गेलं पाहिजे असं न्यायालयाने सांगितलं होतं. 

विजयपत सिंघानिया यांनी आपला मुलगा आणि ‘रेमंड लिमिटेड’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये मुंबईतील मलबार हिलमधील जे के हाऊस या 36 मजली इमारतीतील ड्युप्लेक्स फ्लॅटचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंबंधी वारंवार गौतम सिंघानिया यांना आठवण करुन देण्यात आलं, मात्र त्याचा फायदा झाला नाही असंही याचिकेत म्हटलं होतं. 

दोन्ही पक्षाच्या वकिलांनी पुढील आठवड्यात मीटिंग होणार असल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 11 सप्टेंबर तारीख दिली आहे. दरम्यान न्यायालयाने, रेमंडला जे के हाऊसमधील संपत्तीची विक्री न करण्याचा तसंच तिस-या पक्षाला मधे न आणण्याचा आदेश दिला आहे. 

हा पूर्ण वाद जेके हाऊसबाबत आहे. ही बिल्डिंग १९६० मध्ये बांधली गेली. तेव्हा ती १४ माळ्यांची होती. नंतर या बिल्डिंगचे चार ड्युप्लेक्स रेमंडची शाखा असलेल्या पश्मिना होल्डिंग्सला दिले गेले. त्यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, सिंघानिया यांनी कंपनीतील आपले शेअर मुलाला दिले होते. मीडियात येणाºया बातम्यांनुसार, या शेअर्सची किंमत सुमारे १००० कोटी रुपये इतकी होती. परंतु आता गौतम यांनी त्यांना निराधार सोडले असून त्यांच्याकडून गाडी व चालकही परत घेतले आहेत. मलबार हिल येथे त्यांचा स्वत:चा ३६ माळ्यांचा ड्युप्लेक्स जेके हाऊस आहे. परंतु येथे राहण्यासाठी त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागत आहे.

२०००मध्ये मुलाकडे सोपवली रेमंडची सूत्रे
विजयपत यांचा मुलगा गौतम सिंघानिया याने सन २००० मध्ये रेमंडची सूत्रे हातात घेतली. विजयपत सिंघानिया यांनी २०१५ मध्ये रेमंडमधील आपले १ हजार ४१ कोटीचे ३७.१७ टक्के शेअर्स गौतम सिंघानियाच्या नावे केले. जगभरात प्रसिद्ध असलेल्या रेमंड या वस्त्रोद्योगाचा पाया १९२५ मध्ये रचला गेला. या कंपनीची पहिली रिटेल शोरूम १९५८ मध्ये मुंबईत उघडली गेली. १९८० मध्ये विजयपत यांनी कंपनीची सूत्रे सांभाळली.

Web Title: After the upheaval of the court, Singhania father and son are ready to settle disputes within four walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.