चोरून आलेले सरकार चोरीच करणार, राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 04:25 PM2023-05-08T16:25:30+5:302023-05-08T16:26:07+5:30

... तरीही पंतप्रधान गप्पच का?

A government that steals will steal, Rahul Gandhi criticizes BJP | चोरून आलेले सरकार चोरीच करणार, राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

चोरून आलेले सरकार चोरीच करणार, राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

googlenewsNext

दत्ता पाटील

चिकोडी : कर्नाटकातील जनतेने पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला जनादेश दिला होता. मात्र, घोडेबाजार करून आमदार विकत घेऊन चोरी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेच्या पैशाची चोरी केली. चोरी करून आलेले सरकार चोरीच करणार. देशातील सर्वात भ्रष्ट भाजप सरकारला यावेळी जागा दाखवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. सदलगा (ता. चिक्कोडी) येथे काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्या आल्या सरकारी सेवेत अडीच लाख नोकऱ्या, तर १० लाख युवकांना रोजगार देऊ. तसेच पदवीधर युवकांना दोन वर्षांसाठी ३ हजार रुपये बेकार भत्ता देऊ. लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्या काँग्रेसला १५० हून अधिक जागा जिंकून देऊन बहुमतांनी सत्ता द्या. कर्नाटकाची जनता सुज्ञ असून, ती काँग्रेसला बहुमत देईल याची खात्री आहे, असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

नोटबंदीमुळे कर्नाटकात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा त्यांनी आरोप केला. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देण्याची पंतप्रधानांची घोषणा हवेतच विरली आहे. तसेच कर्नाटकातील भाजप सरकारने विकास कामांच्या निधीतील मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन चोरी केली आहे. आम्हाला सत्ता मिळाल्यास अशा भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि जनतेचा पैसा वाया जाणार नाही, असा विश्वासही गांधी यांनी व्यक्त केला.

यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, महावीर मोहिते, सलीम अहंमद, महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, काँग्रेस नेते मोहन जोशी, वीरकुमार पाटील, अण्णासाहेब हवले, माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, बाळासाहेब पाटील, अरुण देसाई, रवी माळी, श्याम रेवडे, संतोष नवले, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

... तरीही पंतप्रधान गप्पच का?

विकास कामातील ४० टक्के कमिशनबाबत कंत्राटदार संघटनेने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली आहे. सरकारच्या भ्रष्टाचारावर अनेकांनी जाहीर टीका केली. मात्र, अजूनही मोदींनी त्याची दखल घेतलेली नाही. यामागचे गौडबंगाल काय? असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

भाजपचे कमिशन ५० टक्के होईल...

कर्नाटकातील भाजप सरकार हे चोरी करणारे सरकार आहे. येथे ठेकेदारांकडून ४० टक्क्यांपर्यंत कमिशन घेतले जाते. त्यामुळे जर अशा मंडळींच्या हातात पुन्हा सत्ता गेली, तर भविष्यात या कमिशनच्या मागणीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन विकासाला खीळ बसेल, अशी भीतीही गांधी यांनी व्यक्त केली.

...तर घरकुलाचे अनुदान वाढवू

वाढत्या महागाईने घर बांधणीच्या साहित्याच्या दरातही तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थींना दीडऐवजी ५ लाख अनुदान करावे, या प्रकाश हुक्केरी यांच्या मागणीचा संदर्भ देत आपली सत्ता आली तर वाढीव अनुदानाच्या मागणीचीही निश्चित पूर्तता करू, अशी ग्वाहीही राहुल गांधी यांनी दिली.

Web Title: A government that steals will steal, Rahul Gandhi criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.