'या' 5 देशांनी भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला दिली मान्यता, पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 07:34 PM2021-11-01T19:34:38+5:302021-11-01T19:34:45+5:30

भारतात आतापर्यंत 106.31 कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.

5 more country recognises India corona virus vaccination certificate | 'या' 5 देशांनी भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला दिली मान्यता, पाहा संपूर्ण यादी

'या' 5 देशांनी भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला दिली मान्यता, पाहा संपूर्ण यादी

Next

नवी दिल्ली: भारताच्या कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राला आणखी पाच देशांनी मान्यता दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले, "एस्टोनिया, किर्गिस्तान, पॅलेस्टाईन राज्य, मॉरिशस आणि मंगोलियासह आणखी पाच देशांनी भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे."

दरम्यान, या आधीच ऑस्ट्रेलियाच्या औषध आणि वैद्यकीय उपकरणांच्या नियामकाने भारताची कोरोना लस, कोवॅक्सीनला औपचारिकपणे मान्यता दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सीन आणि अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या दोन लसी आहेत. ऑस्ट्रेलियाने या पूर्वीच कोविशील्डला मान्यता दिलेली आहे.

या देशांची मान्यता...

ऑस्ट्रेलिया आणि इतर पाच देशांव्यतिरिक्त जगातील 30 हून अधिक देशांनी भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे. या देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, नेपाळ, बेलारूस, लेबनॉन, आर्मेनिया, युक्रेन, बेल्जियम, हंगेरी आणि सर्बिया यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, भारताच्या लसीकरणास मान्यता असलेल्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य असेल.

देशात 106 कोटींहून अधिक लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, भारतातील कोविड-19 लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी 78 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 38 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी 7 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोविड लसींचे 106.31 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

 

Web Title: 5 more country recognises India corona virus vaccination certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.