नेपाळमध्ये देवीच्या यात्रेत ५ लाख जिवांची कुर्बानी
By admin | Published: November 29, 2014 03:10 AM2014-11-29T03:10:59+5:302014-11-29T20:43:02+5:30
एकविसाव्या विज्ञान युगात श्रध्दा-अंधश्रध्दा जपण्याचा सिलसिला देशात-परदेशात आजही पाहायला मिळतोय. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे नेपाळमधील गांधीमाई या देवीची यात्रा.
Next
ऑनलाइन लोकमत
बारा(नेपाळ), दि. २९ - एकविसाव्या विज्ञान युगात श्रध्दा-अंधश्रध्दा जपण्याचा सिलसिला देशात-परदेशात आजही पाहायला मिळतोय. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे नेपाळमधील गढीमाई या देवीची यात्रा. पशूपक्षांचा बळी देण्याची प्रथा असल्याने या ठिकाणी लाखो जिवांची कुर्बानी दिली जातेय.
भारतीय सीमेच्या हाकेवर असलेल्या या यात्रेत भारतातील लोकही मोठया संख्येने उपस्थित राहतात. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्याच दिवशी जवळपास ५ लाख जीवांची कुर्बानी देण्यात आली. कुर्बानीमध्ये प्रामुख्याने म्हैसचा समावेश असून गाय, कोंबडा, कबुतर, व डुक्कर यांचाही बळी देण्याच प्रथा आहे.
पशु पक्षांची भारतातून अवैधरीत्या निर्यात करण्यावर बंदी असतानाही भारतातून निर्यात होताना दिसते. पशुबळी दिला की देवाची कृपा होतेय अशी समज असल्याने या ठिकाणी निष्पाप जीवांची कुर्बानी देण्यासाठी गांधीमाई यात्रेला लाखो लोक येतात. दोन दिवस चालणा-या या यात्रेत भल्या मोठया रिंगण असलेल्या ठिकाणी म्हैस, पशुपक्षांचा बळी दिला जातो. हा नजारा टिपण्यासाठी चारी बाजुनी नेपाळी लोकांचा कडा असतो. रिंगणमधील कसाई आपल्या धारधार शस्त्राने या जीवांची मुंडकी छाटून कुर्बानी देतो. लाखो लोक उपस्थित असलेल्या यात्रेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकाशे गोंधळ उडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्तही ठेवला जातो. नेपाळी लोकांच्या श्रध्देचा हा प्रश्न असल्याने प्रशासनाला यामध्ये हस्तक्षेप करता येत नसल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी योगेंद्र दुलाल यांनी दिली. तर पशुबळी दिल्याने कोणताच देव प्रसन्न होत नाही हे सांगण्यासाठी या ठिकाणी स्वयंसेवी संस्थाचे कार्येकर्ते मार्गदर्शन करताना आढळतात, परंतू अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे व देवाला प्रसन्न करावयाचे असल्यास जीव हत्या देणे गरजेचे आहे असे समर्थन करीत यात्रेत कुर्बानी देण्यासाठी लाखो लोक येतात. शुक्रवारी सुरू झालेल्या या यात्रेचा शनिवारी समारोप होईल. मात्र पहिल्याच दिवशी ५ लाख पशुपक्षांची कुर्बानी देण्यात आली आहे.