प्रतिमिनट 1 रुपया कॉल रेट, मोदी सरकारने सैनिकांना दिली 'दिवाळी भेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 08:39 PM2017-10-18T20:39:42+5:302017-10-18T20:44:03+5:30

डिजिटल सॅटलाइट फोन कॉल्सचे दर कमी करुन दूरसंचार मंत्रालयाने सशस्त्र आणि निमलष्करी दलातील जवानांना दिवाळीची भेट दिली आहे.

1 rupee call rate per minute, Modi government gives soldiers 'Diwali gift' | प्रतिमिनट 1 रुपया कॉल रेट, मोदी सरकारने सैनिकांना दिली 'दिवाळी भेट'

प्रतिमिनट 1 रुपया कॉल रेट, मोदी सरकारने सैनिकांना दिली 'दिवाळी भेट'

Next

नवी दिल्ली - डिजिटल सॅटलाइट फोन कॉल्सचे दर कमी करुन दूरसंचार मंत्रालयाने सशस्त्र आणि निमलष्करी दलातील जवानांना दिवाळीची भेट दिली आहे. त्यामुळे जवानांना आता आपले कुटुंबिय आणि निकटवर्तींयांसोबत सॅटलाईट फोनवरुन जास्तीत जास्त वेळ बोलता येईल. ही मंत्रालयाने जवानांना दिलेली दिवाळी भेट आहे. यापुढे जवान कॉल चार्जेंसचा फार विचार न करता आपल्या प्रियजनांसोबत जास्त वेळ बोलू शकतात असे दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले. 

याआधी जवान सॅटलाइट फोन कॉल्ससाठी महिन्याला 500 रुपये मोजायचे. या फोनवरुन बोलताना एक मिनिटाचा दर पाच रुपये होता. आता हाच कॉल दर सरकारने प्रतिमिनिट एक रुपया केला आहे. या निर्णयामुळे वर्षाला सरकारच्या तिजोरीवर तीन ते चार कोटी रुपयांचा भार पडेल असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. 

यापूर्वी टाटा कम्युनिकेशन सॅटलाइट फोनची सेवा द्यायची. आता सरकारी कंपनी बीएसएनएल सॅटलाइट फोनची सुविधा देईल. सध्याच्या घडीला देशभरात 2500 सॅटलाइट फोन कनेक्शन्स आहेत. आमची 5 हजार कनेक्शन्स देण्याची क्षमता आहे. पुढच्या सहा महिन्यात गरज पडली तर कनेक्शन्सची संख्या वाढवण्यात येईल असे सिन्हा यांनी सांगितले. 
 

Web Title: 1 rupee call rate per minute, Modi government gives soldiers 'Diwali gift'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.