सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 07:25 PM2021-06-29T19:25:28+5:302021-06-29T19:25:59+5:30
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून पिंपळगाव ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून पिंपळगाव बसवंत पोलिसांनी चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरांना गजाआड करण्यात यश आले आहे. सदर आरोपी येवला येथे सध्या राहत असून ते हरियाणा व राजस्थान येथील मूळ रहिवाशी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड रोड येथे राहणाऱ्या दिलीप नथू पाटील संधान यांची सफेद रंगाची महिंद्रा पिकअप बोलेरो एम एच १५ सी के .९९४७ गुरुवार दि.३ जून रोजी चोरी झाल्याची तक्रार पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती .त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल नितीन जाधव, मिथुन घोडके,पोलीस शिपाई संदीप दराडे,योगेश धोंगडे यांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली. एका गुप्त माहितीदाराने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना पिकअप घेऊन जात असल्याची माहिती दिली. तत्काळ पोलीस कर्मचारी नितीन जाधव ,मिथुन घोडके,संदीप दराडे,योगेश धोंगडे यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी धाव घेतली. पोलिसांना बघताच चोरटे पिकअप घेऊन पळून जाऊ लागले. तेव्हा सिनेस्टाईलने पाठलाग करत अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नाने चोरट्यांना ताब्यात घेतले व गजाआड केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीला गेलेली वाहने लवकरात लवकर सापडतील व चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
एका गुप्त माहितीदाराकडून पिकअप घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने त्याचा सिनेस्टाईलने पाठलाग करत त्या चोरट्यांना ताब्यात घेतले. वाहनधारकांनी सतर्क राहून आपले वाहन पार्क करावे तसेच कोणावर संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत