मुंबईची फेरी नाहीच, पुण्याला मात्र उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:58 IST2017-12-25T00:57:01+5:302017-12-25T00:58:34+5:30

नाशिक : महत्त्वाकांक्षी विमानसेवेच्या शुभारंभाच्या दुसºयाच दिवशी मुंबईची सेवा खंडित झाली. मात्र, सायंकाळी पुण्याच्या दिशेने उडान झाले आणि तेथून प्रवासी घेऊन परतल्याचे सांगण्यात आले. नाशिकहून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी बराच आटापीटा केल्यानंतर अखेर शनिवारी (दि. २३) शुभारंभ करण्यात आला. शुभारंभालाच विलंबाने विमान आल्याने त्याविषयीदेखील बरीच चर्चा झाली.

There is no round of Mumbai, but only flight to Pune | मुंबईची फेरी नाहीच, पुण्याला मात्र उड्डाण

मुंबईची फेरी नाहीच, पुण्याला मात्र उड्डाण

ठळक मुद्देमुंबईची फेरी नाहीच, पुण्याला मात्र उड्डाणविमान पुण्याला गेल्यानंतर रात्री उशिरा परतले.

नाशिक : महत्त्वाकांक्षी विमानसेवेच्या शुभारंभाच्या दुसºयाच दिवशी मुंबईची सेवा खंडित झाली. मात्र, सायंकाळी पुण्याच्या दिशेने उडान झाले आणि तेथून प्रवासी घेऊन परतल्याचे सांगण्यात आले. नाशिकहून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी बराच आटापीटा केल्यानंतर अखेर शनिवारी (दि. २३) शुभारंभ करण्यात आला. शुभारंभालाच विलंबाने विमान आल्याने त्याविषयीदेखील बरीच चर्चा झाली. मुळातच एअर डेक्कनने विमानसेवा सुरू करतानाच २९ तारखेपर्यंत तिकिटे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याने खरी सेवा २३ पासून की ३० तारखेपासून असा प्रश्न चर्चिला होता. अखेरीस ही सेवा सुरू झाली तर शनिवारी रात्री हे विमान पुण्याला गेल्यानंतर रात्री उशिरा परतले. त्यामुळे सकाळची फेरी झाली नाही. मात्र सायंकाळी पुण्याला विमान गेले तसेच परतले, असे व्यावसायिकांनी सांगितले.

Web Title: There is no round of Mumbai, but only flight to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.