मालेगावला सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By श्याम बागुल | Published: November 2, 2018 03:51 PM2018-11-02T15:51:25+5:302018-11-02T15:52:11+5:30

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतकºयांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे.

Suicide of Most Farmers in Malegaon | मालेगावला सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मालेगावला सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next
ठळक मुद्देबागलाण, दिंडोरी खालोखाल : आॅक्टोंबरमध्ये उच्चांक

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक असून गेल्या दहा महिन्यात ८५ शेतक-यांनी विविध माध्यमांचा वापर करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात करण्यात आल्या असून, त्या खालोखाल बागलाण व दिंडोरी या दोन तालुक्यातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्रात आॅगष्ट व आॅक्टोंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.
जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतक-यांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे. या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १३ व १२ शेतक-यांनी चालू वर्षी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी निफाडमध्ये दिंडोरीपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. निफाडमध्ये १३ तर दिंडोरीत ११ शेतक-यांनी जीवन संपविले होते. यंदा मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहमीच टंचाईचा सामना करणा-या बागलाण तालुक्यात गेल्या वर्षी व यंदाही १३ शेतक-यांनी आत्तापर्यंत आत्महत्येचा मार्ग धरला आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतक-यांचे दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना गेल्या वर्षी आॅक्टोंबर अखेर ९५ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. यंदा हे प्रमाण १० ने घटले असले तरी, यंदा पावसाने फिरविलेली पाठ, खरीप व रब्बीचे झालेले नुकसान, भीषण पाणी टंचाई, जनावरांच्या चा-या, पाण्याचा प्रश्न पाहता शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता शेतीतील जाणकार व्यक्त करीत आहेत.
चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, दरमहिन्याला साधारणत: सात ते आठ शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करू लागले आहेत. आॅक्टोंबर अखेर ८५ शेतक-यांनी आत्महत्या केली असून, त्यातील शासकीय मदतीसाठी १७ शेतकरी पात्र ठरले तर ३० शेतक-यांच्या आत्महत्येचे कारणे वेगळी असल्याने त्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. ३८ शेतक-यांबाबत निर्णय प्रलंबीत आहे.

Web Title: Suicide of Most Farmers in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.