पॅनकार्ड क्लबचे गुंतवणुकदार सर्वपित्रीला घालणार सरकारचे श्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 09:14 PM2018-10-06T21:14:45+5:302018-10-06T21:17:06+5:30
नाशिक : पॅनकार्ड क्लब कंपनीवर सेबीने कारवाई केल्याने देशातील ५५ तर महाराष्ट्रातील ३५ लाख गुंतवणुकदार बाधित झाले आहेत़ महाराष्ट्रातील खासदारांच्या माध्यमातून अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊनही गुंतवणूकदारांचे प्रश्न सुटले नाही़ यामुळे गुंतवणूकारांनी मुख्यमंत्र्यांनाही साकडे घातले मात्र उपयोग झाला नाही़ कंपनीच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक मिळत नाही अशी कारणे दिली जात असल्याने गुंतवणुकदारांनी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को- आॅर्डीनेशन कमिटीतर्फे सर्वपित्री अमावस्येला आझाद मैदानावर सरकारचे श्राद्ध घातले जाणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे़

गत दोन वर्षांपासून पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूकदार राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र गोवा, कर्नाटक येथे आंदोलने करीत आहेत़ या संघटनेच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली मात्र उपयोग झाला नाही़ यानंतर राज्यातील खासदारांच्या घरावर घंटानाद आंदोलन केले होते़ हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र यावर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही़ कंपनीच्या मालमत्तेचा नऊ वेळा लिलाव केला मात्र ग्राहक मिळत नसल्याचे कारण दिले जाते़
पॅनकार्ड क्लबमधील गुंतवणुकदारांचे संसार उघड्यावर आले असून सरकार दरबारी खेटा मारूनही न्याय मिळत नाही त्यामुळे गुंतवणूकदारांनी सर्वपित्री अमावस्येला आझाद मैदानावर सरकारचे श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे प्रमुख ज्ञानेश्वर दारवटकर यांनी दिली आहे़ या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार मुंबईला जाणार असल्याची माहिती व्ही़व्हीक़ांबळे, डी़बी़मोरे, पी़पी़सोनवणे, आऱआऱ खांडवे यांनी दिली आहे़