‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ शॉर्ट फिल्म प्रथम

By Admin | Updated: June 2, 2017 01:35 IST2017-06-02T01:35:11+5:302017-06-02T01:35:23+5:30

नाशिक : राष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ८०० शॉर्ट फिल्ममधून नाशिकच्या ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ या शॉर्ट फिल्मला सर्वाेत्कृष्ट शॉर्टफिल्मचे पारितोषिक मिळाले आहे

'In Search of Vithal' short film first | ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ शॉर्ट फिल्म प्रथम

‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ शॉर्ट फिल्म प्रथम

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर झालेल्या ८०० शॉर्ट फिल्ममधून नाशिकच्या ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ या शॉर्ट फिल्मला सर्वाेत्कृष्ट शॉर्टफिल्मचे पारितोषिक मिळाले आहे. सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शनासह सर्वाेत्कृष्ट लघुपट अशी दोन पारितोषिके आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक या शॉर्ट फिल्मने पटकावले आहे.
‘शॉर्ट फिल्म थिएटर’ यांच्यातर्फे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते आणि यात संपूर्ण देशभरातून ८०० हून अधिक फिल्म सादर करण्यात आल्या होत्या. ‘इन सर्च आॅफ विठ्ठल‘ ही वारीवर आधारित शॉर्ट फिल्म असून, गेल्यावर्षी झालेल्या आषाढी एकादशीला ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित करण्यात आली होती. सोशल मीडियावर या शॉर्ट फिल्मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आजही अनेक प्रेक्षक ही फिल्म आवर्जून बघतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अभिषेक कुलकर्णी, सहायक छायाचित्रण रोहित खैरनार आणि संकेत कुलकर्णी यांनी केले असून पार्श्वसंगीत आनंद ओक तर आवाज सदानंद जोशी यांनी दिला आहे.

Web Title: 'In Search of Vithal' short film first