प्रशांत खरोटे यांना पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: July 8, 2017 00:50 IST2017-07-08T00:50:16+5:302017-07-08T00:50:34+5:30

नाशिक : वनीकरण विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ‘लोकमत’चे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना प्रदान करण्यात आला

Prashant kharte awards award | प्रशांत खरोटे यांना पुरस्कार प्रदान

प्रशांत खरोटे यांना पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत सामाजिक वनीकरण विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ‘लोकमत’चे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नागपूर येथे आयोजित सोहळ्यात खरोटे यांना सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
वनमहोत्सवानिमित्त वन- विभागाच्या वतीने राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत सामाजिक वनीकरण विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार खरोटे यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमप्रसंगी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अंबरिशराव आत्राम, आमदार अनिल सोले, समीर मेघे, डी. मल्लिकाअर्जुन रेड्डी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक के. एस. खवारे, मुख्य वनरक्षक संजीव गौर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Prashant kharte awards award