खर्जुलमळा रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:41 PM2020-08-24T23:41:03+5:302020-08-25T01:19:43+5:30
नाशिक : सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात चिखल ही आल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे झालेली दुरवस्था.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात चिखल ही आल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसराला नव्याने विकसित होत आलेल्या वसाहतींमुळे वैभव प्राप्त झाले आहे. परंतु या परिसरातील रस्ते चीखलमय झाल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधी व मनपाचे रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून या भागातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.