पाथरेत केंद्रीय समितीची भेट
By admin | Published: November 6, 2015 10:58 PM2015-11-06T22:58:05+5:302015-11-06T22:59:39+5:30
पाथरेत केंद्रीय समितीची भेट
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द व पाथरे बुद्रुक या दोन्ही गावांत सर्वंकष सहभागी नियोजन प्रक्रिया योजनेंतर्गत केंद्रीय समितीने भेट देऊन विकासकामांची पाहणी केली.
या समितीत महात्मा गांधी नरेगाचे संचालक डी. के. सिंग, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे अर्थशास्त्र सल्लागार मनोरंजन कुमार, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी जी. एस. गाडीलकर यांचा समावेश होता. यावेळी सिंग यांनी बचतगटांच्या महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला. सर्वंकष सहभागी नियोजन प्रक्रिया योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे नियोजन करताना लोकसहभाग हा मूलभूत घटक म्हणून ओळख करून देणे असल्याचे सिंग यांनी सांगितले. ग्रामपंचायतमार्फत होणारे प्रत्येक काम ग्रामसभेपुढे ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. रोजगार हमी योजनेच्या जॉब कार्डच्या माध्यमातून लोकांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यातून मिळणारा पैसा थेट काम करणाऱ्याच्या बॅँक खात्यात जमा होणार असून, मागेल त्याला काम मिळणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
सिन्नर पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे यांनी समितीचे आभार मानले. मनरेगाचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सिन्नरचे तहसीलदार मनोजकुमार खैरनार, दत्ता वायचळे, धनंजय जगताप, अरुण दातीर, ललिता डोंगरे, सुकदेव गुंजाळ, मच्छिंद्र चिने, सविता नरोडे, मीननाथ माळी, सुनीता वाणी, गोविंद मोरे, एस. जी. धालपे यांच्यासह तिन्ही गावांतील ग्रामपंचायत सदस्य, बचतगटांच्या महिला, मुख्याध्यापक, शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
केंद्रीय समितीसह जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी पाथरे खुर्द व पाथरे बुद्रुक या दोन्ही गावांत पायी फिरून पाहणी केली. कृष्ण मंदिर व जय अंबामाता मंदिरात दोन्ही गावांचा रांगोळीने काढलेला नकाशा, वृक्ष लागवड व संवर्धन, अंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण, ग्रामस्वच्छता, नियोजन, शेततळे यांना भेटी देऊन माहिती घेत समाधान व्यक्त केले.