कलानगरला दुचाकीने घेतला पेट

By Admin | Updated: April 21, 2017 01:26 IST2017-04-21T01:26:45+5:302017-04-21T01:26:54+5:30

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या कलानगर येथील एका अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभ्या असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने रहिवाशांची धावपळ उडाली होती.

Kalanagara bicycling took place | कलानगरला दुचाकीने घेतला पेट

कलानगरला दुचाकीने घेतला पेट

 इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या कलानगर येथील एका अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभ्या असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने रहिवाशांची धावपळ उडाली होती. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
कलानगर येथील एव्हरेस्ट हाइट्स इमारतीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या एका दुचाकीने सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. आगाचे लोट पाहताच रहिवाशांची धावपळ झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशामक दलास फोन केला असता तातडीने सिडको अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तातडीने अग्निशामक दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहनास लागलेली आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
प्रत्येक इमारतीत आगप्रतिबंधक यंत्र बसविणे आवश्यक असताना या इमारतीत सदर यंत्र नसल्याने आग तातडीने विझविता आली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Kalanagara bicycling took place