अवैध शस्त्र आढळून आल्याने अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:14 IST2017-08-02T16:13:43+5:302017-08-02T16:14:04+5:30

अवैध शस्त्र आढळून आल्याने अटक
नाशिक : श्रमिकनगर सातपूर परिसरातील यादव क ो-आॅप हौसिंग सोसायटीमध्ये राहणाºया दोघांना अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबड पोलीसांनी यादव सोसायटी परिसरात जाऊन संशयित राहुल छेदीलाल मौर्या (१८), प्रशांत ब्रम्हदेव मिश्रा (२१) यांचा शोध घेतला. दरम्यान हे दोघे येथील एका शाळेजवळ पोलिसांना मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता धारधार मोठा सूरा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.