अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:56 IST2017-07-19T00:55:35+5:302017-07-19T00:56:10+5:30

अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली

Honor to Anna Bhau Sathe | अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली

अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने साठे यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी समाजकल्याणमंत्री बबन घोलप यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. घोलप यांनी साठे यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती देत आजही त्यांचे साहित्य समाजाला प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे सांगितले. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, संपत जाधव, विश्वास कांबळे, अशोक साठे, गोपाळ बस्ते, दशरथ बलसाने, सुभाष शेजवळ उपस्थित होते.

Web Title: Honor to Anna Bhau Sathe