लखमापुर येथे शॉटसर्किटने पाच एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:19 IST2018-02-23T14:18:41+5:302018-02-23T14:19:07+5:30
दिंडोरी :- येथील कल्पना मोगल व मनुबाई मोगल यांच्या पाच एकर ऊस विजेच्या शॉर्टसर्किटने जळाल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

लखमापुर येथे शॉटसर्किटने पाच एकर ऊस खाक
दिंडोरी :- येथील कल्पना मोगल व मनुबाई मोगल यांच्या गट क्र मांक २३३ मध्ीाल पाच एकर ऊस विजेच्या शॉर्टसर्किटने जळाल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी मोगल यांच्या शेतातून एव्हरेस्ट इंडट्रीज ला विज पुरवठा करणार्या उच्च दबाच्या एक पोलवरील तारेचा जंम्प (दोन वायर जोडणारी) तुटल्याने झालेल्या शॉटसर्किेटमुळे उसाच्या शेतात आगेचे गोळे पडल्याने आग लागली. आग इतकी भीषण होती की त्यात उसाला वाचविण्याचे सर्व पर्याय विफल ठरले. यात क्षणार्धात संपूर्ण ऊस जाळून खाक झाला. नुकसान ग्रस्त शेताला कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गटआॅफिस चे अधिकारी जाधव, कोंड, तलाठी नंदकुमार गोसावी, कृषि सहाय्यक संदीप बोरावे, वणी पोलीस स्टेशनचे पारखे, शार्दूल, जाधव विजवितरण कंपनीचे कंपनीचे मोरे यांनी पहाणी करून पंचनामा केला. विजवितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळेच पोलवरील जंप तुटून उसाला आग लागली. यात झालेल्या नुकसानीला विज वितरण कंपनीच जबाबदार असून नुकसानीची भरपाई देण्याची मागणी मनुबाई मोगल व कल्पना मोगल या महिला शेतकºयांनी केली आहे.