जिजामाता विद्यालयात विद्यार्थिनींचा सत्कार

By Admin | Updated: June 19, 2017 00:47 IST2017-06-19T00:47:34+5:302017-06-19T00:47:50+5:30

जिजामाता विद्यालयात विद्यार्थिनींचा सत्कार

Felicitation of students in Jijamata School | जिजामाता विद्यालयात विद्यार्थिनींचा सत्कार

जिजामाता विद्यालयात विद्यार्थिनींचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : येथील जिजामाता कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. प्रथम एक ते पाच क्र मांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा देवळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र अहेर कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव गंगाधर सिरसाठ, नगरसेवक जितेंद्र अहेर आदी मान्यवर उपस्थित होते. जिजामाता कन्या विद्यालयाचा ९९.५० टक्के निकाल लागला असून, प्रांजल श्रावण अहेर व मृणाली दीपक पाटील विद्यालयातून प्रथम आल्या. ऋ तुजा संजय सोनवणे, श्रध्दा अनिल अहिरराव, देविका संजय पगार व कल्याणी जितेंद्र आहेर, आदिती विजय आहेर यांनी नेत्रदीपक यश मिळविले.
सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा प्राचार्य हितेंद्र अहेर, गंगाधर शिरसाठ यांच्या हस्ते गुलाबपुष्प व स्मृतिचिन्ह देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका उषाताई बच्छाव, पर्यवेक्षक अनिल अहेर, आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Felicitation of students in Jijamata School