गणेशोत्सवातून जातीय सलोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:23 IST2017-09-01T01:22:28+5:302017-09-01T01:23:25+5:30

विविध सण-उत्सव, परंपरांमधून अनेकदा राष्टÑीय एकात्मता व जातीय सलोखा दिसून येतो. सध्या गणेशोत्सव सुरू असून, शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये हिंदू-मुस्लीम कर्मचाºयांनी एकत्र येत गणरायाची आराधना करत गणेशोत्सवात सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले.

Ethnic harmony of Ganeshotsav | गणेशोत्सवातून जातीय सलोखा

गणेशोत्सवातून जातीय सलोखा

नाशिक : विविध सण-उत्सव, परंपरांमधून अनेकदा राष्टÑीय एकात्मता व जातीय सलोखा दिसून येतो. सध्या गणेशोत्सव सुरू असून, शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये हिंदू-मुस्लीम कर्मचाºयांनी एकत्र येत गणरायाची आराधना करत गणेशोत्सवात सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले.
मातोश्री ट्रॅव्हल्स प्रा.लि. या सातपूर येथील औद्योगित वसाहत असलेल्या भागातील कंपनीत एकोप्याने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा पाळली जात आहे. हिंदू-मुस्लीम कर्मचारी आरतीप्रसंगी सहभागी होत असल्याचे एकात्मतेचे चित्र पहावयास मिळत आहे. कंपनीचे संचालक संस्थापक राजमल चोरडिया, आनंद चोरडिया, मयूर चोरडिया, जयंत सोनवणे, किरण ठोंबरे, मनोज राजुदे, प्रदीप सरोदे, सोनू थोरात, रज्जाक खान, तौसिफ खान, शाहीद खान आदी एकत्र येत गणेशोत्सव साजरा करत आहे.

Web Title: Ethnic harmony of Ganeshotsav