अभियंत्याला निवेदन : रायते परिसरातील शेतकरी विजेअभावी हतबल १५ दिवसांपासून रोहित्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:10 IST2018-03-10T00:10:49+5:302018-03-10T00:10:49+5:30
येवला : रायते परिसरातील जळालेले रोहित्र बदलून मिळावे, अशी मागणी शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अभियंत्याला निवेदन : रायते परिसरातील शेतकरी विजेअभावी हतबल १५ दिवसांपासून रोहित्र बंद
येवला : तालुक्यातील रायते परिसरातील जळालेले रोहित्र बदलून मिळावे, अशी मागणी परिसरातील लाभधारक शेतकºयांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रायते उपकेंद्रातील उपअभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दोन दिवसांत रोहित्र बदलून मिळाले नाही, तर उपोषण करण्यात येईल, अशा इशाराही देण्यात आला आहे. परिसरातील शेतकरी वारंवार जळणाºया रोहित्राला वैतागले असून, शेतीधंदा सोडून रोजंदारी करायला जावे की काय, अशा मन:स्थितीत आहेत.