नाशिकला उड्डाणपुलाखाली अखेर पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू

By श्याम बागुल | Published: August 31, 2018 04:03 PM2018-08-31T16:03:32+5:302018-08-31T16:07:22+5:30

कमोदनगर येथून महामार्ग उड्डाणपूल ओलांडताना बुधवारी (दि.२९) संध्याकाळी अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण सिडको परिसरावर शोककळा पसरली होती. मागील तीन वषार्पासून कमोदनगर जवळ उड्डाणपुलाच्या खाली बोगदा करण्याची मागणी केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उड्डाणपुल ओलांडतांना आत्तापर्यंत २५ हून अधिक लोकांचा बळी गेला.

At the end of the flyover of Nashik, the work of the pedestrian subway is finally completed | नाशिकला उड्डाणपुलाखाली अखेर पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू

नाशिकला उड्डाणपुलाखाली अखेर पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू

Next
ठळक मुद्देसुंदरबन कॉलनी-कमोदनगर पादचारी भुमिगत मार्गाचे काम सुरूफरांदे-गोडसे यांच्यात श्रेयवाद : मृत कोमलच्या वडीलांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

नाशिक : दोन दिवसांपुर्वी सुंदरबन कॉलनीकडून कमोदनगरकडे जातांना उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांची दखल घेत शुक्रवारी सिडकोतील नागरीकांना इंदिरानगरकडे जाण्यासाठी सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर असा उड्डाणपुलाच्या खालून पादचारी भुयारी मार्ग करण्याच्या कामाचा शूभारंभ अपघातातील मयत कोमलचे वडील आशिष तांबट यांच्या हस्ते करण्यात आला.


कमोदनगर येथून महामार्ग उड्डाणपूल ओलांडताना बुधवारी (दि.२९) संध्याकाळी अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण सिडको परिसरावर शोककळा पसरली होती. मागील तीन वषार्पासून कमोदनगर जवळ उड्डाणपुलाच्या खाली बोगदा करण्याची मागणी केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उड्डाणपुल ओलांडतांना आत्तापर्यंत २५ हून अधिक लोकांचा बळी गेला. महामार्ग प्राधिकरणाला बोगदा तयार करण्यासाठी अजून किती बळी हवेत असा संतप्त सवाल उपस्थित करत खासदार हेमंत गोडसे यांना सुमारे २०० हून अधिक महिलांनी घेराव घातला होता. महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाखालील पादचारी भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात न केल्यास महामार्ग रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. त्या पार्श्वभुमीवर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमदार देवयानी फरांदे यांनी कमोदनगर वासियांची भेट घेतली व महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी प्रशांत खोडस्कर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पादचारी भुयारी मार्गाचे काम तातडीने काम सुरू करण्याच्या सुचना केल्या. त्यावर खोडस्कर यांनी, सुंदरबन कॉलनी समोरून भूमिगत मार्गाचे कामाला सुरुवात करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर कमोदनगर येथे शेकडोच्या संख्येने जमलेल्या महिला व आमदार फरांदे, नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, शाहीन मिर्झा, चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे आदींनी कमोदनगर पासून समांतर रस्त्याने पेठे नगर समोरील यू-टर्न ची पाहणी करीत सुंदर बन कॉलनी समोरील भूमिगत कामाच्या ठिकाणी पोहोचले. दुसरीकडे सुंदरबन कॉलनी येथेही शिवसेना नगरेसवक कल्पना पांडे,माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे, शिवाजी चुंभळे, सागर पाटील, राजू बिलीव्ह, प्रदिप कोते, नाना दळवी, राजेंद्र देसाई, प्रदिप कोतवाल, ठोंबरे,धनंजय दळवी आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. याच वेळी खासदार हेमंत गोडसे यांचेही या ठिकाणी आगमन झाल्याने नागरिकांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या.

 

Web Title: At the end of the flyover of Nashik, the work of the pedestrian subway is finally completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.