भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:18 IST2018-02-15T16:18:20+5:302018-02-15T16:18:39+5:30
सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या भाजपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांवर पुन्हा एकदा निराश होण्याची वेळ आली आहे.

भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव कोसळले
सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या भाजपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांवर पुन्हा एकदा निराश होण्याची वेळ आली आहे. सिन्नरच्या भाजीबाजारात मेथी व कोथंबिरीची मातीमोल भावाने विक्री होत असल्याचे चित्र आहे.
पहाटे येथील चौदा चौक वाडा शॉपिंग सेंटरच्या भाजीबाजारात घाऊक दराने भाजीपाल्याची विक्री होत असते. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला घेऊन येत असतात. गुरुवारी पहाटे मेथी, कोथंबिर, पालक, कोबी, फ्लॉवर यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभाव घसरल्याचे चित्र होते. होलसेल भाजीबाजारात वांगी, काकडी, दोडके, शिमला मिरची, कोबी, वाटाणा, फ्लॉवर, मेथी, कोथंबिर या सारख्या पालेभाज्या मोठया प्रमाणात दाखल झाल्या होत्या. वांगी आवक वाढल्याने बाजारभाव घसरलेले आहे. वांगी ४ ते ५ रूपये प्रति किलो दराने विक्र ी होत आहे तर भोपळयाचे बाजारभाव घसरण झाली आहे. भोपळयाच्या प्रति नगाला ३ ते ४ रूपये तर कोबी व फ्लॉवरचे कंद ३ ते ५ रुपये दराने विक्री होत आहे. शिमला मिरची २० ते २५ रूपये, दोडके २५ ते ३० रूपये असा बाजारभाव किलोमागे शेतकºयांना मिळत आहे. सध्या हिवाळा असल्याने मोठया प्रमाणात फळभाज्यांची आवक वाढलेली आहे. याशिवाय मध्यप्रदेशातून वाटाणा मोठया प्रमाणात दाखल होत असल्याने ग्राहकांचा कल वाटाणा खरेदीकडे जास्त असल्याने अन्य फळभाज्यांच्या बाजारभावावर परिणाम झाला आहे.