हिरे कुटुंबीयांचे राजकीय वर्तुळ पूर्ण

By श्याम बागुल | Published: December 8, 2018 12:54 AM2018-12-08T00:54:56+5:302018-12-08T00:55:19+5:30

कॉँग्रेसच्या विचारसरणीत घडलेल्या हिरे कुटुंबीयांनी नेहमीच सत्तेच्या परिघातच राहणे पसंत केले, परिणामी पुष्पाताई हिरेंच्या रूपाने राज्याच्या सत्तेवर अनेक वर्षे या कुटुंबाने राज्य केले. कालांतराने राजकारणाचे वारे काहीसे उलटे फिरू लागताच, पुष्पातार्इंचे पुत्र प्रशांत हिरे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत उचलले. पुन्हा राज्यात व केंद्रात कॉँग्रेस आघाडीची सत्ता येताच, राष्टÑवादीशी घरोबा केला. परंतु राष्टÑवादीने जिल्ह्णाचे राजकीय नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करताच, नाराज हिरे कुटुंबीयांनी स्वत:ला काहीकाळ विजनवासात कोंडून घेतले. साडेचार वर्षांपूर्वी सर्वत्र भाजपाचा बोलबाला सुरू झाला असता, प्रशांत हिरे यांचे पुत्र अपूर्व यांनी शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडून येत सत्ताधारी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व पत्करले. आता राज्यातील राजकीय वातावरणात होत असलेल्या बदलाच्या वारूवर स्वार होत, हिरे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ कॉँग्रेसच्या घराण्याशी नाळ जोडून घेत आपले राजकीय वर्तुळ पूर्ण केले.

The diamond family's political circle is complete | हिरे कुटुंबीयांचे राजकीय वर्तुळ पूर्ण

हिरे कुटुंबीयांचे राजकीय वर्तुळ पूर्ण

googlenewsNext

नाशिक : कॉँग्रेसच्या विचारसरणीत घडलेल्या हिरे कुटुंबीयांनी नेहमीच सत्तेच्या परिघातच राहणे पसंत केले, परिणामी पुष्पाताई हिरेंच्या रूपाने राज्याच्या सत्तेवर अनेक वर्षे या कुटुंबाने राज्य केले. कालांतराने राजकारणाचे वारे काहीसे उलटे फिरू लागताच, पुष्पातार्इंचे पुत्र प्रशांत हिरे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत उचलले. पुन्हा राज्यात व केंद्रात कॉँग्रेस आघाडीची सत्ता येताच, राष्टÑवादीशी घरोबा केला. परंतु राष्टÑवादीने जिल्ह्णाचे राजकीय नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करताच, नाराज हिरे कुटुंबीयांनी स्वत:ला काहीकाळ विजनवासात कोंडून घेतले. साडेचार वर्षांपूर्वी सर्वत्र भाजपाचा बोलबाला सुरू झाला असता, प्रशांत हिरे यांचे पुत्र अपूर्व यांनी शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडून येत सत्ताधारी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व पत्करले. आता राज्यातील राजकीय वातावरणात होत असलेल्या बदलाच्या वारूवर स्वार होत, हिरे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ कॉँग्रेसच्या घराण्याशी नाळ जोडून घेत आपले राजकीय वर्तुळ पूर्ण केले.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांनी मुंबईत राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने त्यातून नाशिक जिल्ह्यातील राजकारणात भविष्यात काही उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, जिल्ह्णाच्या राजकारणावर भुजबळ यांची असलेली मजबूत पकड पाहता, हिरे कुटुंबीयांना भुजबळ यांच्याशी मिळते-जुळते घेऊनच आगामी वाटचाल करावी लागणार आहे. निव्वळ हिरेंच्या प्रचारसभेला भुजबळ उशिरा पोहोचल्याने पराभव पत्करावा लागला या एकमेव कारणातून निर्माण झालेल्या भुजबळ द्वेषातून हिरे कुटुंबीयांनाही गेल्या साडेचार वर्षांत फारसे काहीही साध्य झाले नाही या वास्तवाचे भान जसे त्यांना उमगले तसेच त्याची अप्रत्यक्ष किंमत भुजबळ यांनाही काहीशी भोगावी लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाला नाही म्हटले तरी, हिरेंची नाराजीही काही प्रमाणात कारणीभूत राहिली आहे. परंतु आता भुजबळ यांनाही याची जाणीव झाली व त्यातूनच हिरे यांच्या राष्टÑवादीचा प्रवेश सुकर झाला हेदेखील मान्य करावे लागेल. ज्या भुजबळ यांच्यामुळे
राजकीय विजनवासात पत्करावा लागला. त्या भुजबळांशी उघडपणे दोन हात करण्याचे आव्हान
देणाऱ्या हिरे कुटुंबीयांनीच जुळवून घेण्यास पुढाकार घेतला, त्यातूनच तुरुंगात असलेल्या भुजबळ
यांना कोर्टात भेटण्यास हिरेंनी धाव घेऊन संवादाचा पहिला सेतू निर्माण केला व प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समीर भुजबळ यांनी हिरेंचा उंबरठा ओलांडल्याने या दोन्ही कुटुंबीयातील जवळीकता वाढीस लागली.
आता हिरे स्वगृही परतल्याने त्यामागे नक्कीच राजकीय असेलच हे जसे नाकारता येणार नाही, तसेच हिरे यांनासोबत ठेवल्यानेच भुजबळ यांचीही जिल्ह्यातील राजकीय वाटचाल सुकर होणार आहे.

Web Title: The diamond family's political circle is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.