संविधान गौरव दिन सोहळा

By Admin | Updated: November 26, 2015 22:18 IST2015-11-26T22:18:13+5:302015-11-26T22:18:56+5:30

विविध उपक्रम : शहरात भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त रॅली, प्रस्तावनेचे वाचन

Constitution Gaurav Day Souvenir | संविधान गौरव दिन सोहळा

संविधान गौरव दिन सोहळा

नाशिक : संविधान दिनानिमित्त नाशिक शहर, तसेच नाशिकरोड, सिडको, गंगापूररोड, पंचवटी, देवळाली कॅम्प आदि परिसरातील शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांतर्फे प्रतिमापूजन, प्रास्ताविका वाचन आणि प्रभात फेरी संविधान गौरव रॅली काढण्यात आली.
नाशिकरोड येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, युवा जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, नगरसेवक सुनील वाघ, समीर शेख, सुनील कांबळे, भारत निकम, दिलीप साळवे, दिलीप जाधव, भाऊसाहेब जगताप, संतोष पाटील, दिनेश जाधव, पंडित साळवे, राजू जाधव, सुनील यशवंते, राजाभाऊ वानखेडे, शरज गायकवाड, उद्धव खैरे, संजय जाधव आदि उपस्थित होते.

Web Title: Constitution Gaurav Day Souvenir