युवकाची गोदापात्रात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:09 AM2018-09-14T01:09:08+5:302018-09-14T01:09:32+5:30

शाळा-महाविद्यालयीन युवक-युवतींवर वाढता ताणतणाव व त्यामधून येणाऱ्या नैराश्यापोटी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. एका १७ वर्षीय युवकाने बापू पूलावरून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.

Childhood Suicide in the Godavari | युवकाची गोदापात्रात आत्महत्या

युवकाची गोदापात्रात आत्महत्या

Next

नाशिक : शाळा-महाविद्यालयीन युवक-युवतींवर वाढता ताणतणाव व त्यामधून येणाऱ्या नैराश्यापोटी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. एका १७ वर्षीय युवकाने बापू पूलावरून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस रामदास सांगळे (१७, रा. निसर्गनगर, म्हसरूळ) याने बुधवारी (दि.१२) संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास पुलावरून गोदापात्रात उडी घेतली. याबाबतची माहिती, मुख्यालयामधून पंचवटी अग्निशामक उपकेंद्राला मिळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. यावेळी पाण्याच रबरी बोट सोडून त्यांनी गोदापात्रात तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोन ते अडीच तास जवानांनी गोदापात्र पिंजून काढल्यानंतर तेजसचा मृतदेह शोधण्यास त्यांना यश आले. तेजसच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. संदीप रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या खबरवरून गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास हवालदार शेख करीत आहे.

Web Title: Childhood Suicide in the Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.