अतिक्रमणविरोधात सातपूरला मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:04 IST2018-04-06T01:04:40+5:302018-04-06T01:04:40+5:30

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सातपूर विभागात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली

Campaign against the encroachment at Satpur | अतिक्रमणविरोधात सातपूरला मोहीम

अतिक्रमणविरोधात सातपूरला मोहीम

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सातपूर विभागात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली तसेच नाशिक पूर्व विभागातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते अशोकामार्ग परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विक्रेत्यांना हटविण्यात आले. महापालिकेच्या पथकाने सातपूर आय.टी.आय. पूल ते महात्मानगर तसेच सिग्मा हॉस्पिटल येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेले विक्र ेते हटविण्यात येऊन आय.टी.आय. पूल व कार्बन नाका या ठिकाणी सुमारे २५ टपऱ्या हटविण्यात आल्या. तसेच एक पानटपरी, एक हातगाडी यांसह साहित्य जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे सातपूर गावातील भाजीबाजार हटविण्यात येऊन संबंधितांचे भाजीपाला व इतर साहित्य जप्त करणेत आले. पूर्व विभागातील, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते अशोकामार्ग आदी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेले विक्रेते हटविण्यात येऊन संबंधितांचे शेगडी, टेबल, छत्री, स्टुल आदी साहित्य जप्त करून ओझर जकात नाका येथे जमा करण्यात आले.
अतिक्र मण विभागाची दोन पथके, एक जे.सी.बी. यांसह पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात होता.

Web Title: Campaign against the encroachment at Satpur